-
नाविक – NAAVIK
मी तुझी आहेच नाविक दिव्य आत्म्या मी सुवासिक पुष्प नाजुक दिव्य आत्म्या सोनचाफा तू दिलेला आठवोनी भावना झरतात साजुक दिव्य आत्म्या नाद घंटेचा जिनांच्या मंदिरातिल ऐकण्या मी मौन साधक दिव्य आत्म्या ओतता माधुर्य मधुरा काव्य कुसुमी मोगरा फ़ुलतोच सात्त्विक दिव्य आत्म्या पौर्णिमेचा चंद्र शीतल किरण सांडी ज्ञान खिरते शुद्ध तारक दिव्य आत्म्या गझल अक्षरगणवृत्त (मात्रा…
-
बागवान – BAAGVAAN
हित मित प्रिय “मी” बोले माझा ऐकत आत्मा डोले माझा दांडू घेउन परमेष्ठींचा अचल विटी “मी” कोले माझा गर्भगृहातिल गर्भ पाहण्या अहमपणा “मी” सोले माझा नवरात्रीच्या रंगांमध्ये कायेला “मी” घोले माझा हाती पकडुन तुला फळांना बागवान “मी” तोले माझा गझल मात्रावृत्त (मात्रा १६)
-
दिव्य औषधी – DIVYA AUSHADHEE
मी निळे प्राशुनी निळी बावरी बनले मी हिरवे प्राशुन सृजनामध्ये रमले मी कुंकुम प्राशुन लुटुन निसर्गा आले मी गडद रक्तिमा गाली फासुन खुलले मी हळद प्राशुनी गोरीमोरी झाले मी जर्द केवड्यासम रानी घमघमले मी जांभुळ प्राशुन दिव्य औषधी झाले मी मूक पारव्या जीवन पुन्हा दिधले मी धवल प्राशुनी धवल कशी ना झाले मी इंद्रधनूच्या रंगात…
-
चिल्लर – CHILLAR
दहा दहा रुपयांची नाणी देऊ तुजला फक्त दहा जपुन ठेव ती चिल्लर म्हणुनी लाविल तुजला शिस्त दहा दशधर्माची ध्वजा फडकुदे धर्मस्थळांवर मनुजांच्या सोळा संस्कारे मन भरण्या घालिल आता गस्त दहा रावण जिनधर्मी संस्कारी स्पर्श न केला सीतेला आत्मा त्याचा जिनानुयायी नका म्हणू हो स्वस्त दहा कर आदर तू सत्याचा अन आर्जव शुचिता धर्मांचा पुरे टवाळी…
-
जुनेरे – JUNERE
फुले धरेवर जशी सांडती तश्या भावना सांडू आपण काव्य रचूनी ताजे ताजे विचार सुंदर धाडू आपण कर्म जरी प्राचीन जुनेरे स्वच्छ धुवोनी नेसू आपण तेच सोवळे आहे मानून स्तुती जिनांची गाऊ आपण जसा आपुला विचार उमटे तशी भावना उमलुन यावी शब्दांमध्ये गुंफुन तिजला बुद्धीपूर्वक मांडू आपण सरळ अर्थ काव्यातून दिसण्या सरळ सरळ अन सरळ बघूया…
-
अघहर – AGHAHAR
वय माझे बघ झाले सत्तर भेटायाला आले जलचर फुलात दडला सुगंध हो तू हवा वाहण्या चंचल नवथर मूर्त घडवशिल केव्हा माझी प्रश्न पुसाया येतिल पत्थर पदर उडे वाऱ्यावर रमणी नकोच होऊ कातर सावर जिनास वंदन करते बालक बिंब सावळे आहे अघहर गझल मात्रावृत्त – (मात्रा १६)
-
स्वप्न निळे – SWAPN NILE
डोईवरती पंखा लाल जास्वंदीचे जणु ते गाल किनार काळी पंखाकार फांदीवरती पक्षी बाल पाने गाती वसंत गान झुळझुळ वारा देतो ताल सांग कोणता गाऊ राग उजळ उजळ बघ माझे भाल घेता खग कंठातुन तान अवखळ निर्झर बदले चाल विहगा गगनी घेऊन झेप लूट घनातिल मौक्तिक माल मेंदी रंगी स्वप्न निळे बघत रहा पांघरुन शाल गझल…