-
म्यूट – MYOOT
वागणे बेछूट आता सोडुनी दे सूट आता सोड काथ्याकूट आता सेल ठेवुन म्यूट आता भाजले मी शेंगदाणे कर तयांचा कूट आता चक्रव्यूहा भेद बाणा उलगडाया कूट आता पांघरोनी घोंगड्याला नागव्यांना लूट आता संपले अवतार मिथ्या तू इथूनी फूट आता रिक्त जागा भर सुगंधे भरुन याया तूट आता गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा १४) लगावली –…
-
गैर बाळे – GAIR BAALE
सावलीची कैक बाळे बाळ छाया स्वैर बाळे तू जरासे ऊन पांघर रापण्याला ऐक बाळे शीक सत्याचीच भाषा मिथ्य आहे गैर बाळे कष्ट झाले फार आता कर जरा तू ऐश बाळे फिर सुनेत्रा छप्परातुन दाव त्यांना ऐट बाळे गझल – अक्षरगणवृत्त (मात्रा १४) लगावली – गालगागा/गालगागा/
-
फुले – FULE
राजहंस दो निळे सरोवर डोंगरमाथ्यावर शिवशंकर हिरवी हळदी कुंकुमवर्णी आठवणींची फुले धरेवर सुंदर गोष्टी ना क्षणभंगुर अक्षय झरणारे ते निर्झर खळाळत्या भावना झर्याच्या तयात हसते निळसर अंबर काठावरच्या लता वल्लरी जलात बघती अपुले अंतर बदके लाटांवरती आरुढ ओढा जणु भरतीचा सागर लाटांमधली हवा काढण्या तुझा सुनेत्रा आहे संगर गझल मात्रावृत्त – मात्रा १६
-
स्याद्वाद आहे – SYAADVAAD AAHE
निर्झराचा नाद आहे ही जलाची साद आहे उमटते जी कागदावर ती प्रियेची दाद आहे प्राशुनी मी काव्यगंधा चाखला तव स्वाद आहे पूर्ण जाणे आत्मियाला तो खरा स्याद्वाद आहे मैत्र जडता पाखरांशी गूज अन संवाद आहे नासवीले दूध त्याने त्यास तो मोताद आहे मायभूचा करुन सौदा जाहला बरबाद आहे रंगती गप्पा स्मृतींच्या माजतो तो वाद आहे…
-
शर्वरी – SHARVAREE
दाटता आभाळ काळे नाच नाचे शर्वरी घालुनी पायात वाळे नाच नाचे शर्वरी बोलणे टाळे अताशा व्यर्थ काथ्याकूट तो लावुनी ओठांस टाळे नाच नाचे शर्वरी उमटता सौदामिनीची सागरावर अक्षरे सागरी लाटांस चाळे नाच नाचे शर्वरी गडगडाटी युद्ध होता सावळ्या जलदांतले सोदण्याने नीर गाळे नाच नाचे शर्वरी तीन दगडांच्या चुलीवर पात्र भरले ठेवुनी वाळल्या काष्ठांस जाळे नाच…
-
कुळवाडीण – KUL VAADEEN
गझलेची या हडळ जाहली हझल वाचवायला मध्यरात्र होताच जाय ती रान कोळपायला आमटी भाकरी खाऊन पोरगं जाय साळंला मायंदाळ शिकलं मोठं झालं म्यागी पचवायला खारट कडवट पचवून हसतो सदासर्वदा तो पचलं नै वाटतं म्हणतं कोणी त्याला खिजवायला कुळवाडीण शेतात राबते खांब घराचा ती अंगण झाडुन लगबग जाते शेत भांगलायला फिरुन डोंगरी करवंदाच्या पाट्या भरुनभरून मैना…
-
जलतरंग – JAL TARANG
मुसळधार पावसात पांघरून गारवा वळचणीस थांबलाय चिंब चिंब पारवा गार गार घन टपोर नाचतेय अंगणी जाहला सुस्नात मुग्ध पारिजाति कारवां तरुतळी बकुळ फुले सुगंध मंद उधळिती त्यांस अंथरून दाट अंगणास सारवा सांजरंग मिसळलेत निर्झरात नाचऱ्या जलतरंग वाजवीत मरुत गाय मारवा मेघ बरस बरसतात मोतिरूप जोंधळे मौक्तिकांस त्या चुरून पाखरांस चारवा गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा…