Tag: Marathi Ghazal

  • सोहम – SOHAM

    प्रथम दीन तव कुवेड गे गरम मीन तव कुवेड गे टोचत आहे तुझे तुला कलम पीन तव कुवेड गे जा जा जा तू कर काळे तलम जीन तव कुवेड गे नकोच दारी पाय तुझा परम हीन तव कुवेड गे कुदेव-देवी मूढ मती शरम लीन तव कुवेड गे सम्यक्त्वाने संपविले अधम बीन तव कुवेड गे सोहम…

  • बेछूट – BECHHOOT

    तो गुन्हा माझाच होता मी मजेने बोलले ते जरा होतेच वेडे मैत्र त्यांनी टाळले काय मी बोलून गेले वय जरी नादान ना बोलणे बेछूट त्यांचे लाखदा मज बोचले आजही करतेच जखमी ना स्वभावाला दवा कर्मफळ मिळतेच त्याचे पुरवितेना चोचले मज जरी माहीत होते मी कुठे नव्हते उणी प्रीतिच्या गाभ्यात शिरण्या मी तपाने वाळले भयफुला तू…

  • यात्रा – YAATRAA

    वेध तुझ्या यात्रेचे मज अता लागले रे दर्शनास आतुर डोळे साद ऐकते रे एक एक पाउल उमटत,असे वाज वाजे संगतीस प्रियजन त्यांची गाज जाहले रे निळ्या डोंगराच्या रांगा नभा वेढणाऱ्या गाठण्यास टोके सुंदर गात चालले रे पल्लवीत हिरव्या राया मोहरून आल्या आम्र मंजिरी मी मजला झुळुक चुंबते रे सुनेत्रात भरुनी घेउन स्वरुप आत्मदेवा तुझे भाव…

  • वडापाव – VADAA PAAV

    घरकामाला सुट्टी घे पण नको आज तू भांडुस सखये वडापावची गाडी आली नको पसारा मांडुस सखये वडापाव हा जरी कालचा पाव भाजला तुपात खरपुस खलात त्याला टाकुन वेगे नकोच रागे कांडुस सखये तू तर माझी प्रियतम साकी खिलव वडे या रसिक जनांना गझलांनी मी भरले प्याले नको ग त्यांना सांडुस सखये नको टमाटे वडे फेकणे…

  • कविता माझी – KAVITAA MAAZEE

    कविता माझी बोलत असते माझ्यासंगे कविता माझी भांडत असते माझ्यासंगे भूक लागता कडकडुनी मज लपवुनी कागद कविता माझी जेवत असते माझ्यासंगे चिंब भिजविता भाव भावना सुकण्यासाठी कविता माझी वाळत असते माझ्यासंगे कविता म्हणजे व्यक्ती नाही अंतर माझे कविता माझी पाहत असते माझ्यासंगे अंतरातली साद ऐकण्या साद घालुनी कविता माझी ऐकत असते माझ्यासंगे अमूल्य माझे हृदय…

  • गोखरू – GOKHAROO

    गगन भरारी घेण्यासाठी सज्ज पाखरू पुन्हा जाहले धावायाला कुरणावरती सज्ज कोकरू पुन्हा जाहले गाय चाटता वात्सल्याने वाघाच्या बछड्यास सानुल्या क्षीर प्यायला वाघीणीचे सज्ज वासरू पुन्हा जाहले मौन जरी मी तुम्हास वाटे मंजुळ छुमछुम वाजायाला पैंजणातले अस्सल नाजुक सज्ज घुंगरू पुन्हा जाहले कर्मनिर्जरा होण्यासाठी अंगागाला बोचायाला बाभुळकाटे कुसळ सराटे सज्ज गोखरू पुन्हा जाहले मेंढपाळ मी गौर…

  • मनमौजी – MAN-MAUJEE

    पुत्र असा मम दिव्य मणी कन्या सुंदर गुण रमणी झिम्मा फुगडी अन पिंगा खेळायाला चल सजणी उजाड माळावर बागा माझी सुंदर ही करणी गझल गझालां मनमौजी हरिणी म्हण वा तिज हरणी सुनेत्रात हे सुनेत्र दो जणू क्षमेची लाल फणी गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)