-
पान – PAAN
पान पान रंगलेय गीत गात गात पान पान गंधलेय गीत गात गात पुष्प पुष्प सांगतेय गोष्ट एक छान पान पान छंदलेय गीत गात गात ऊन्ह नाचुदेच आज कोवळे धुमार पान पान झोपलेय गीत गात गात सांग प्रेमिकांस बोध प्रेम आत्मियात पान पान फेकलेय गीत गात गात चिंब चिंब गझल गान भिजवतेय झाड पान पान सोकलेय…
-
शासन – SHAASAN
हवे कशाला परक्याचे तुज आसन रे वाद्य चोरुनी कशास करिशी वादन रे फुलव अंतरी शुद्ध भाव अन गात रहा करावयाचे असेल तुज जर गायन रे परस्त्री संगे भोगाची का तुज इच्छा या करणीने होइल तुजला शासन रे सम्यक्त्वाचे बीज रुजाया तव हृदयी शुद्धात्म्याचे कर तू पूजन अर्चन रे गुणानुरागी होउन गुण तू घेत रहा कर…
-
हिम्मत – HIMMAT
नजर भिडविण्या मम नजरेला हिम्मत लागे हात लावण्या मम कमरेला हिम्मत लागे हवीच तुज जर माझी मैत्री बदल स्वतःला धडक द्यावया मम टकरेला हिम्मत लागे मार हव्या तू चकरा जितक्या मारायाच्या मोल द्यावया हर चकरेला हिम्मत लागे नकोस नखरा फक्त करू तू सांभाळ तया सांभाळाया त्या नखरेला हिम्मत लागे भाषेमध्ये मिसळुन भाषा एक कराया रूळ…
-
गुंडा – GUNDAA
कवी शायरांची जात स्वाभिमानी कलम लेखणीची पात स्वाभिमानी दिव्या जोजवीते वीज होत पेटे जळे कापुरासम रात स्वाभिमानी गुणी नाजुकाही जाळतेय भोगा निळी केशराची वात स्वाभिमानी फिरे नागिणीसम पेलण्या नभाला पुन्हा टाकण्याला कात स्वाभिमानी असा पुत्र गुंडा आणखी पतीही जणू बत्तिशीचे दात स्वाभिमानी खुली वाट होण्या ओढती रथाला खऱ्या सारथ्याचे हात स्वाभिमानी सुनेत्रा नि मधुरा काव्य…
-
मिठी – MITHEE
आठवतेका मिठी घट्ट ती कडकडुनी जी तुला मारली आठवतेका प्रिया तुझी तुज प्रीतीने तू जिला मारली प्रियतम तू अन मीच प्रियतमा चुम्बाया तुज आसुसलेली चुंबुन माझे अधर मिठी तू माझ्यातिल मृदु फुला मारली बरेच झाले तुझ्या मिठीने सरळ मनाला जपावयाला भोगासाठी हपापलेली कारस्थानी कला मारली प्रयोग माझे सत्याचे हे खऱ्या अहिंसक जीवांसाठी सत्याच्या तलवारीने मी…
-
सुखदा – SUKHADAA
नवी खास वाटे गुणाची सुखदा खरा भाव जपते ऋणाची सुखदा किती सरळ आहे सलिलता मृदुता घडी मस्त घाले खणाची सुखदा म्हणे बाप भाऊ जणू फुल मधुरा म्हणुन वाट लावे तणांची सुखदा जळूसारखी जी घराला चिकटे तिला जाळ लावी पणाची सुखदा पुरे माज मस्ती उतरणे जरुरी खडा घाव घाली घणाची सुखदा लगावली – लगागा/ लगागा/ लगागा/ललगा/…
-
पान कोरे – PAAN KORE
पुन्हा पान कोरे कसे आज सुंदर कळ्यांचे फुलांचे खुले राज सुंदर फुलावी खुलावी नव्हाळी उषेची उन्हाने दवाचे नवे साज सुंदर गुलाबी रुपेरी हवा सागरीही तिची मी समुद्री निळी गाज सुंदर जशी बोट नादात कंपात चाले तसे अंतरात्म्यात आवाज सुंदर तुला आठवोनी धुके मुक्त विरुनी सुनेत्रात माझ्या उभे ताज सुंदर लगावली – लगागा/ लगागा/ लगागा/ लगागा/…