Tag: Marathi Ghazal

  • जाडी जाडी JAADEE JAADEE

    नको आज होंडा गाडी हिंड नेसून राखाडी हिरव्या नाजुक काठाची उद्या शाल केशर काडी कुर्ती सफेद वाणाची घाल बन नावाडी गुल्लाबाचं होउन फूल परवा फिर वाडी वाडी उडे दुपट्टा आकाशी झगा जांभुळ फुलझाडी कुंकुम वर्णी काठाची जर्द रेशमी हळदाडी गडद निळी ग नऊ वारी नेसुन दिस जाडी जाडी

  • “ती” – “TEE”

    मी पुण्याची शान आहे संस्कृतीचे पान आहे मी सुगंधी केवड्याचे प्रकृतीचे रान आहे मी तुझ्या सच्च्या सुखांनी दाटलेले गान आहे ऐकण्या गाणे तुझे मी तानसेनी कान आहे लेक माझा सावळा अन लेक गोरीपान आहे मी भुकेल्या मूक जीवा वाढलेले पान आहे स्वच्छ त्या हिरव्या चहाच्या मी कपाचा कान आहे केरळातिल श्यामसुंदर मी गुरूहुन सान आहे…

  • स्वर्ग – SWARG

    किती मी किती मी सुखे गात आहे दवाच्या तुषारे उभी न्हात आहे हवे ते हवेसे मला नित्य लाभे उणे ना कशाचेच स्वर्गात आहे मला स्वर्ग दिसतो तुम्हा स्वर्ग दिसतो तिथोनीच मोक्षास मी जात आहे फुलाया ग जीवा असा गंध देते जणू केवड्याची खरी पात आहे तुझ्या कैक वचनात साऊल गाणी जशी माय माझी पिता तात…

  • ध्यास श्वास – DHYAAS SHVAAS

    असा ध्यास माझा असा श्वास माझा गझल सोनचाफा तसा श्वास माझा हवा प्राणवायू वरीही तुतारी हृदय स्पंदताना जसा श्वास माझा पहा हो स्मराहो हवेला हिवाळी नका मज पुसू हो कसा श्वास माझा पहाटे दुपारी जरी रात्र भासे कळा दाबण्याला नसा श्वास माझा सुनेत्रात रमला किती भार वाहत जपाया टिकाया वसा श्वास माझा AKASHARAGAN VRUTT –…

  • अंतरज्वाला – ANTAR JVAALAA

    मी न दुखविले व्यर्थ कुणाला म्हणून मजला दुःख नसे सदैव जपली अंतरज्वाला म्हणून मजला दुःख नसे हृदयी माझ्या रहावया ये कायमचे तू खरे खरे असे निमंत्रण दिले सुखाला म्हणून मजला दुःख नसे निसर्ग नियमांचे नित पालन करुन रक्षिते स्वधर्म मी स्वच्छ ठेविते ह्रुदय जलाला म्हणून मजला दुःख नसे अक्षर अक्षर सजीव होते लहरीवर मम काव्याच्या…

  • आभाळ – AABHAAL

    मातीत मळून आलंय आभाळ भरून आलंय आभाळ ढगास ओढत वीजेस धरून आलंय वीजेस धुमार सौरभ अर्पून सजून आलंय रंगीत फुग्यास कोंडत वायूस चिरून आलंय पुत्रात चिराग दीपक कन्येत लवून आलंय हर्षात भ्रमात नाचत वातात झुलून आलंय चष्म्यास स्वतःच फोडत इगोत जळून आलंय पुष्पात सुगंध चंदन रूपात खुलून आलंय स्थापून जिनास शांतित ब्रम्हास वरून आलंय दारात…

  • गर्वाचे घर – GARVAACHE GHAR

    गर्वाचे घर कर्दमि रुतले मम प्राणावर तू नभ धरले अतिव सुखाने हृदय स्पंदले धुके हळुहळू विरले खिरले निर्भय निर्भय अभय जाहले मी प्रेमाने विश्व जिंकले पूर्ण प्रीतीचे गीत प्रकटले लेखणीतुनी माझ्या झरले ‘मी’ पण माझे मला भावले लिहून गझला पुरून उरले मात्रा १६…