-
वेश्या – VESHYAA
वेदीवरी वेश्या निजे काळास का मी दोष देऊ निर्लज्ज आई बाप ते बाळास का मी दोष देऊ मौनातल्या गझलेतले जे शेर बब्बर कर्मयोगी त्यांनीच कर्मे उकरता फाळास का मी दोष देऊ गप्पा कधी शेजेवरी सुचतात का हे सांग वेडे बाबा बुवा कुटतात त्या टाळास का मी दोष देऊ भट्टीतल्या सोन्यापरी तावून आत्मा झळकताना अंगात भरल्या…
-
पण नको कुरवाळणे ते – PAN NAKO KURAVALHANE TE
मैफिलीतुन घ्यावयाचे राहिले आलाप काही… हेच का तुज दुःख आहे पण नको कुरवाळणे ते गोडवा भावात होता ते तुला कळलेच नाही… हेच का तुज दुःख आहे पण नको कुरवाळणे ते गोल होता नीलवर्णी घागऱ्याचा घेर मोठा पोलक्याची तलम बाही मलमलीचा पोत होता शुभ्र त्या तव पोलक्याची मळविली त्यांनीच बाही… हेच का तुज दुःख आहे पण…
-
धोंडा – DHONDAA
कशाला हेवेदावे करण्या भांडण तंटे कशाला कपटी कावे करण्या भांडण तंटे उशाशी धोंडा खाण्या कोंडा आवड ऐसी कशाला कोणी यावे करण्या भांडण तंटे शिव्यांचा मारा गुटका मावा यातच जगण्या कशाला दारू प्यावे करण्या भांडण तंटे मनाची शुद्धि आत्मानंदी आपण सैनिक कशाला राजे व्हावे करण्या भांडण तंटे सुनेत्रा नावे गझला लिहिते आनंदाने कशाला कोणा खावे करण्या…
-
इलाही – ILAAHEE
ज्याचा गुरू इलाही त्याला उणे न काही ज्याचा गुरू इलाही वैरीच त्यास नाही ज्याचा गुरू इलाही त्याच्यात प्रेम राही ज्याचा गुरू इलाही त्याच्यात कपट नाही ज्याचा गुरू इलाही त्याची मळे न बाही ज्याचा गुरू इलाही त्याचीच शुभ्र बाही ज्याचा गुरू इलाही ओझे न त्यास काही ज्याचा गुरू इलाही त्यासी दुरून पाही ज्याचा गुरू इलाही त्याचे…
-
खरी प्रीत माझी – KHAREE PREET MAAZEE
कसे काय बोलू, कसे काय साहू, मला हे कळेना, तुझ्याशी जुळेना, खरे मैत्र माझे, खरी प्रीत माझी, सुनेत्रा… किती सोसला मी, तुझा हा दुरावा, तरी का वळेना, तुझ्याशी जुळेना, खरे मैत्र माझे, खरी प्रीत माझी, सुनेत्रा…. जरी पावसाचा टिपुस ना मिळाला, उन्हाळ्यात तगले, तुझ्या आठवांना जपोनीच फुलले, किती यत्न्य केले जगाया… निळ्या उष्ण झोतात न्हाले…
-
धात्री – DHAATREE
सजुन धीर यात्री मला भेटण्या ये भरुन नीर गात्री मला भेटण्या ये निळ्या लुप्त सीमा तिथे दृश्य मीरा करुन मीरा खात्री मला भेटण्या ये घनी दुग्धधारा धवल चांदण्यांच्या भरुन क्षीर पात्री मला भेटण्या ये पहाटे दवाने पुरी चिंब भिजते म्हणुन खीर रात्री मला भेटण्या ये जिथे गाठ गुंता तिथे मज बुलावा बनुन तीर कात्री मला…
-
फुलझड्या – FUL ZADYAA
नको करू तू नको फारसा विचार माझा नको दाखवूस कोठे बसला प्रहार माझा थकले आता प्रहार करुनी विचार करुनी नको वाटते कुणी करावा पुकार माझा मला वाटते सर्व सोडुनी जावे का मी कुठे जायचे जिथे तिथे बघ तिहार माझा जीव गुंतला फुलांमधे या कसा सोडवू कसा द्यायचा गोड फुलांना नकार माझा पुणे सांगली साताऱ्याला जाणे…