-
न्याय – JUSTICE
-
हे झाड सांगते गुज मला ! – “This tree is telling me its secrets”
हे झाड सांगते काय मला `.. कथा सांगते जणु मजला.. गुजगोष्ट सांगते मला… पानांच्या ओठातुन हसते..हळुवार सळसळते सांगते.., ” या दगडी भिंतींचा भक्कम शेजार मला! प्रभातीस हे ऊन कोवळे ..भाद्रपदातील .. खेळते बागडते माझ्या देहावरती ..या दगडी भिंतींवरती.. इथल्या भूमीच्या कणकणावर …मुक्तपणे…! हवा वाहते शीतल झुळझुळ … परिमल भिजल्या पानफुलांचा…ओल्या खोडांच्या सालीचा .. अन मातीचा…
-
सुखद गारवा – “pleasant coolness”
पीत गुलाबी दल पर्णांकित खोड उभे पाठी नाजुक कुसुमांच्या रंगांच्या सोडविण्या गाठी झाड फुलांनी भरून गेले पानांची गर्दी हलवुन फांद्या मीच पाडला पाऊस माझ्यासाठी भल्या पहाटे सुखद गारवा हवा लपेटुन तना भिजल्या वाटेवरुन जातसे गात पुढे मी मना मना तुझिया संगे करते मी गप्पागोष्टी मोर कोकिळा साद घालती संवादासाठी चला उमटू द्या अंतरातुनी हवेहवेसे गीत…
-
खट्याळ पोर – NAUGHTY GIRL
खट्याळ अवखळ पोर बागडे घरात अवती भवती … पक्ष्यांच्या पंखांवर बसुनी उडते अवती भवती… मजेमजेचे खेळ बेरकी मुग्ध निरागस भाव … वृक्षांच्या राईत तिचा हा निसर्ग सुंदर गाव… गुणगुणते ती मनात रचते अर्थपूर्ण गाणे … वाऱ्यावरुनी वाहत येती तालांकित तराणे … सान गोडुली नात गोमटी खोड्या किती करते .. स्वतः स्वतःच्या रचून गोष्टी आम्हाला सांगते…
-
षण्मुख – SHANMUKH(SIX-FACED)
-
वेळ – VEL(TIMING)
-
स्वानुभव – SWANUBHAV(SELF EXPERIENCE)
सत्य सांगुनी शांती मिळते. सत्य उघड कर सुयोग्य वेळी मिळण्या शांती. सत्य हेच स्वानुभव मोठा गुरु आपुला. सत्य असे जी स्तुती पोचते सहज अपुल्यापाशी. सत्य धर्म आर्जव आणि मार्दवात रे. सत्य जाणल्यावरती संयम खरा धर्म रे . सत्याला कळते लवकर हे लघु होण्यातच सुख आहे रे . सत्य जाणुनी ज्ञान वाढते अभिमानाला संपवते . सत्य…