Tag: Marathi Kavita

  • तराई – TARAAEE

    तराईतल्या शांत उपवनी खजिना अक्षररूप कुणी लपविला कोणासाठी खोदुन खोदुन कूप बर्फ जाहल्या सरोवरांवर धुके दाटले गूढ काठावरती झाड जाळते चंदनगंधीत धूप शिशिरामध्ये उपवन अवघे मौनी आत्मस्वरूप व्रतस्थ पक्षी मूकपणाने आळवितो ग भूप पानगळीने वृक्षतळीची माती पर्णांकीत वसंत वाऱ्याची चाहुल मन करते काव्यांकीत

  • अनुकूल – ANUKOOL

    अनुकूलच हे द्रव्य क्षेत्र नि काळही आम्हास भूतकाळही अतीव सुंदर दिसतो बिंबात वर्तमानही जगून सुंदर उजळ भविष्यास दिगंबरांच्या जैन पथावर फुलवू काव्यात सान बालके तरुण पिढीला दिशा दाखवून जिनानुयायांच्या धर्माला नेऊ विश्वात गृहस्थ जीवन जगता जगता मोक्ष पथिक होत निर्भय आम्ही ठेवू तेवत प्रेमाची ज्योत मात्रावृत्त (मात्रा २५)

  • किरमिजी (KIRMIJEE)

    सृष्टीवरल्या प्रेमाची गोष्ट मोठ्या गोडीची कशी सांगू कळेना पेन्सिल बोथट वळेना टोक केले भरभर अक्षरे झरली झरझर केशरी किरमिजी रंगाची टपोर सुगंधित अर्थांची अक्षरे केली गोळा पाणी आले डोळा उंच मस्त हवेली शब्दविटांची बनली इंद्रधनुच्या रंगांनी रंगवली मी ढंगानी बिजलीला ती आवडली म्हणून ढगातून हसली

  • गजरा – GAJARAA

    गडद निळे गडद गडद आभाळ सावळे झाले काळ्या काळ्या जलदांनी नभ भरुनी आले मौक्तिक माळा घालुन सजल्या श्याम मेघना शीळ घालतो मारुत मंजुळ खग घेती फांदीवर ताना झरझर झरझर झरती धारा टपटप टपटप पानांवरती मुदगंधाचा सुगंध प्राशुन शब्द उधळले पानांवरती गोळा करुनी शब्द अंजलीत टपोर गजरा कुणी बनविला माय आठवे सुंदर माझी तिनेच गजरा असा…

  • प्रिय प्रिय मजला – PRIY PRIY MAJALAA

    मी न घालते नियम दुजावर बंधन घाले मी माझ्यावर माझा संयम प्रिय प्रिय मजला माझ्या सौंदर्यावर भुलला अस्त्र लेखणी भेदुन लक्ष्या जाळ्यामध्ये पकडे भक्ष्या शस्त्र लेखणी फिरे मनावर काळी शाई झरते झरझर जलद सावळा बरस बरसतो भाव भावना झिमझिम झरतो अक्षर अक्षर उजळत जाते त्यात लख्ख ब्रह्मांड झळकते

  • मैत्री माझी – MAITREE MAAZEE

    कोणाला मैत्रीत हसायचं असतं… कोणाला काही सांगायचं असतं …. कोणाला काही पहायचं असतं… कोणाला काही ऐकायचं असतं… कोणाला कधीतरी रडायचंही असतं …. कोणाला तर काहीही करायचंच नसतं …. पण तरीसुद्धा …. मैत्रीच्या समूहात टिकायचं असतं …. वेगळे वेगळे असलो तरी …. वेगळेपणाला खूप खूप जपत… सगळ्यांसोबत रहायचं असतं…. सगळ्यांचंच सगळं सारखं नसतं …. बरंच काही…

  • यष्टी – YASHTEE

    ताल मज साधायचा सूर मज पकडायचा लय मला पकडायची… माझिया गझलेतली…. भावघन गाण्यातला भाव मज सांडायचा अर्थ पण जाणायचा… माझिया जगण्यातुनी …. गोष्ट मज ऐकायची गोष्ट मज सांगायची गोष्ट मज वाचायची… माझिया दृष्टीतुनी …. मिळविली दृष्टी खरी जगवुनी सृष्टी खरी अंतरी यष्टी खरी … माझिया धर्मातली….