-
काळाला ना घाबरते – KALALA NA GHABARTE
धवल झेंडूचे गोंडस झेले बघत राहूदे आले गेले पर्णांच्या पोपटी मनावर झुंबर अंबर निळसर शेले … काळाला ना घाबरते वेळेला मी सावरते हृदयी माझ्या मम आत्मा मायपित्यांना आठवते … वाद नको संवाद हवा काव्याचा मज नाद हवा साद घालण्या खरी खरी आल्या पुन्हा शब्द सरी …
-
खरा सोबती धरतीचा – KHARA SOBATI DHARTICHA
हृदयी स्थापित मम आत्मा, ईश्वर माझा मम आत्मा. आत्म्यासंगे बोलत मी, करते कर्मे सदैव मी. निसर्ग अवती भवतीचा, खरा सोबती धरतीचा. प्राणवायूचे कोठार, उघड उघड.. म्हणते द्वार. शुद्ध मोकळी हवा हवी, गोष्ट सुचाया पुन्हा नवी.
-
क्षण पकड – KSHAN PAKAD
खिडकीतुनी काय दिसे…. सांग मना सांग तुला … कौलारू घर निवांत … झोपलाय प्रहर शांत … या इथे पण पहा … वाऱ्याने सळसळता … पिंपळ बघ हसत उभा … पिंपळ करी सळसळ बघ … सोड वृथा हळहळ बघ … घे जगून क्षण पकड … उघड उघड … दार उघड… पिंपळ हा सांगतसे … विसर शब्द…
-
पल्लवीत – PALLAVEET
धवलगान गावयास उत्सुक मन पल्लवीत… अंतरात भावपुष्प … लिहित होत पल्लवीत … ताटवा फुलून मंद… उधळतोय प्रीत गंध … टळटळीत प्रहर वेळ… जुळव शब्द भावबंध ….
-
नाजुक चण – NAAJUK CHAN
नाजुक चण .. कणखर मन … फिकुटल्या गुलाबी पाकळ्यात … लपेटून तन …. मन लुटतय … निसर्गाचं धन… डेझी डेलिया ..चमेली चाफा … रंगबिरंगी … फुलांचा वाफा … अवतरला भुईवर … जादुई ताफा …
-
कलश – KALASH
भाव शुद्ध अर्पिते प्रभूला प्रभूसम होण्या ओंजळ भरली शुभ्र फुलांनी अर्घ्य वाहण्या जाई जुई प्राजक्त मोगरा विपिनी फुलला सळसळणाऱ्या नवपर्णांनी पिंपळ सजला निसर्गातले रंग उधळण्या वसंत आला आभाळातून कलश घनांचा झरू लागला सृष्टीमातेच्या चरणी मम माथा झुकला
-
आसू आणि पाऊस – AASU ANI PAAUS
पाऊस पावसाळ्यात पडून जातो… पावसाचा ऋतू असतो… तेव्हाच पाऊस पडून जातो.. जमिनीत मुरतो..शेतात पडतो… रानावनात कोसळतो… कधी माती वाहून नेतो… कधी विहिरीतले मृत झरे जिवंत करतो… घरांवर छप्पर फाडून कोसळतो… कधी कधी मग नद्यांना पूर येतो… काठावरची गावे जलमय होतात… धरणे जोहड भरून जातात.. कधी कधी पावसाचा ऋतू पण कोरडाच जातो.. पाऊस पडतच नाही… शेतकऱ्याच्या…