Tag: MARATHI LITERATURE

  • होळी अशी जगाची – HOLI ASHI JAGACHI (HOLI FESTIVAL)

    In this Ghazal the poetess says, Now I am free. I don’t want to find out the answer within the question. I want to live life truly. कसलाच छंद आता मज बांधणार नाही हृदयी असेल घुंगरू मी नाचणार नाही मी फोडले असेका ते वाजले असे का प्रश्नात उत्तरांना मी शोधणार नाही डोळ्यात सांडलेले तू चांदणे…

  • खजिना – KHAJINA (TREASURE)

    Akasharganvrutta used in this Ghazal is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA LA. In this ghazal the poetess says, I have tried my best to get answers of  painful questions. अंगार पेटलेला मी पाहिला तुझ्यात तापून लाल वारा झाला निळा तुझ्यात निशब्द हुंदक्यांनी काळीज गोठताच सारी अबोल गाणी…

  • गझलेत बोलते मी – GAZALET BOLATE MEE (I AM SPEAKING IN LANGUAGE OF GAZAL

    गझलेत बोलते मी गझलेत रांगते मी वाऱ्यास झिंगलेल्या गझलेत डांबते मी वेडी म्हणोत कोणी अथवा अतिशहाणी बेधुंद मम कहाणी गझलेत कांडते मी बाईस दु:ख जाळी बाई तिलाच टाळी बाईपणा निराळा गझलेत मांडते मी धर्मास गाडुनी का नावास पूजती हे पूजा करा गुणांची गझलेत सांगते मी या वाहिन्या नि पत्रे हितगुज नित्य करिती सज्ञान माध्यमांशी गझलेत…

  • पंच कल्याणिक पूजा – PANCH-KALYANIK PUJA(TIRTHAKAR FESTIVAL)

    लेखिका-सुनेत्रा नकाते पूर्व प्रसिद्धी – प्रगती आणि जिनविजय, २३ ऑक्टोबर २००९ दीपावली विशेषांक गेल्या २५ -३० वर्षात पंचकल्याणिक महोत्सवातील डामडौल, आर्थिक उधळपट्टी पाहता या महोत्सवाला बदलत्या काळानुसार योग्य तो आकार देणे ही आजची खरी गरज आहे. पूजा महोत्सवात तासनतास घसाफोड करून घेतलेले बोली व चढावे व त्यातून मिळणारा पैसा हा खरेतर स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.…

  • प्रतिमा – PRATIMA (IMAGE)

    शुद्ध चांदीच्या निरांजनी या शुद्ध तुपासह वात तेवते; कारण आजी कापूस पिंजुन वळून वाती जपुन ठेवते. गाळुन जल  हे आजोबांना नात गोमटी आणून देते, अभिषेकाने प्रभूची प्रतिमा कषाय मनीचे अपुल्या नेते. गुलाब, चंपक, जुई, मोगरा परडीमध्ये फुले जमवितो, खट्याळ नातू सर्वांआधी आईसाठी फुले निवडतो. आजी गाते भजन आरती बाळांसाठी अन अंगाई, बाबा रचती कवने गीते…

  • दीड शहाणे – DID SHAHANE (WISEACRE)

    In this poem the poetess wants to say that in this world people who work with good intention are decided mad by selfish people. Creativity or creative work is important in our daily routine life. जग वेडयांचे होते तेव्हा शहाणे होते थोडे अति शहाणे झाले सारे वेड्यांना पडले कोडे जग वेडयांचे छान साजरे फुला-मुलांची गर्दी…

  • एकदा – EKADA (ONCE)

    हे खरे की बरे सांगना एकदा जे नकोसे तुला टाळना एकदा ऐकताना नको अर्थ खोदू असे कीस पाडायचे सोडना एकदा दे मला तू तुझी सर्व स्वप्ने जुनी केशरी रंग तिज फासना एकदा ओळखीचे कुणी भेटले हासले गाळुनी भाव तो बोलना एकदा आणली मी फुले पाकळ्या चांदण्या खेळ तो साजरा मांडना एकदा वृत्त- गा ल गा,…