जडलीय प्रीत माझी जिन शासनावरी या
शांतीत चित्र भिजण्या गण शासनावरी या
उलटेन डाव कपटी बांधावयास मुसक्या
घनघोर युद्ध करण्या वन शासनावरी या
जहरी कुटील नीती उखडावयास वेगे
आलाय फौज फाटा घन शासनावरी या
मी शूर लेकरांची आई स्मरून हृदयी
प्राणा पणास लावे धन शासनावरी या
आहेच मी ‘सुनेत्रा’ करण्यास सार्थ नावा
अग्नीत झेप घेते रण शासनावरी या