Tag: MARATHI LITERATURE

  • जांभुळलेले दिवस – JAMBHUILELE DIVAS (DAYS OF TEEN AGE)

    This poem describes state of happy mind. Our mind becomes colourful like nature. अजून माझ्या मनी गुलाबी चाफा हिरवा दरवळतो रे आठवणींचा मोर निळा तो धवल धुक्यातुन अवतरतो रे गाभूळलेली चिंच तपकिरी दातावरती दात हुळहुळे जांभुळ भरले झाड जांभळे जांभुळलेले दिवस कोवळे रंग धरेचा पिऊन श्यामल बकूळ मातीत लोळण घेते नक्षत्रांच्या पीत फुलांसम आठवणींची नक्षी…

  • खुळा शोक – KHULAA SHOK (CRAZY WEEP)

    खुळा शोक धो धो रडू लागला तळीचा फुपाटा उडू लागला बघा झेप घेती नभी पाखरे कुणी उंबऱ्याशी अडू लागला कशाने फुलावा अहंकार हा उन्हाने फुलोरा झडू लागला जरी एक आंबा असे नासका फळांचा ढिगारा सडू लागला किनाऱ्यास होडी तिथे लागता पुराने किनारा बुडू लागला जरी सत्य आहे तुझे बोलणे तरी डोस त्यांना कडू लागला निघाल्या…

  • मौन सोड तू – MOUN SOD TOO (BREAK YOUR SILENCE)

    मौन सोड तू, फक्त एकदा; करावया मज, रिक्त एकदा. होउन पुन्हा, तप्त एकदा; जिंक मुला तू, तख्त एकदा सैर कराया आभाळाची; व्हावे म्हणते, गुप्त एकदा. लढावयाची, ना भीती मज; पुन्हा सांडते, रक्त एकदा. नेत्रांमधुनी, हृदयी ये तू; होइन पुन्हा, भक्त एकदा.  

  • नवी शिकार – NAVEE SHIKAAR (NEW TARGET)

    In this Ghazal the poetess says, If you become open minded you will be able to solve biggest problems in your life. उघड झरोके, कवाड दार! सहज सागरा, करशिल पार! दो नयनांची, पाहुन धार! हृदय जाहले, पुरते  गार! क्षणाक्षणाला, नवी शिकार! तीर म्हणूकी, तुज तलवार! का थरथरतो, माझा श्वास? गझल असावी, त्यावर स्वार! येशिल का…

  • झरोके – ZAROKE (SMALL WINDOWS)

    Zaroke(झरोके) means small windows. उघडून दाव त्यांना गीतातले झरोके झाकू नकोस आता हृदयातले झरोके तोडेन तारकांना दिवसा उजेड असता उल्केस दावण्या मी गगनातले झरोके या माणसातसुद्धा असती लबाड कोल्हे शोधा तुम्ही तयांच्या डोळ्यातले झरोके अलवार गझल माझी हलकेच कंप पावे श्वासातुनी खुलावे शब्दातले झरोके पाण्यात पेटलेले प्रतिबिंब हासणारे तव लोचने ‘सुनेत्रा’ बिंबातले झरोके वृत्त- गा…

  • काय लिहू मी – KAAY LIHOO MEE (WHAT WILL I WRITE)

    सांग मायना काय लिहू मी पुत्र लेक की माय लिहू मी कुंडी मधल्या वटवृक्षावर विशाल की बोन्साय लिहू मी मैत्र जिवांचे व्यक्त कराया नमस्कार की हाय लिहू मी गझलेच्या भाळावर शीर्षक क्षीर लिहू की साय लिहू मी प्रीत कळीला शब्द समर्पक मुग्ध खरा की शाय लिहू मी तलफ यावया गझलेसाठी चहा पिऊकी चाय लिहू मी…

  • फाइट फाइट – FIGHT FIGHT

    In this Ghazal the poetess uses various words which have different meaning in Marathi and English language. These special words are used as radif in this Ghazal. प्रकाश, हलका, लाइट लाइट! लिही, बरोबर, राइट राइट! वाऱ्यासंगे, हवेत उडतो; पतंग माझा, काइट काइट! बूच असे मी, घट्ट लावले; गच्च म्हणा वा,टाइट टाइट! रातराणिची, प्रिय सखी ही;…