Tag: MARATHI LITERATURE

  • मल्हार राग गाऊ – will sing raag malhar

    डोळ्यात साठलेला घनगर्द भाव पाहू मेघात दाटलेला मल्हार राग गाऊ उडवीत मृत्तिकेला वाहील मस्त वारा जलदातुनी सुखाच्या वर्षोत प्रेमधारा नाचोत पंचभूते देहात कोंडलेली तुटूदेच साखळीही हृदयास काचणारी हातात हात घ्यावा तू नाचऱ्या विजेचा कर श्वास मोकळा तू मौनातल्या धरेचा ही वीण घट्ट मी ची उसवेन मी स्वतःही आभाळ बरसता हे बरसेन मी स्वतःही

  • टमाटे – TAMAATE

    आज टमाटे संपव तू चित्र नव्याने रंगव तू वहीवरी जे लिहिशी ते अक्षर अक्षर टंकव तू द्वेषाचे अन भोगाचे शिल्प बुभुक्षित भंगव तू वासनेत ती बुडे जरी प्रेमाने तिज गंडव तू तापवणाऱ्या डोक्यांना सतत बोलुनी भंडव तू घाण साठता कोंड्याची पूर्ण कुंतले मुंडव तू सम्यकदर्शन होण्याला आत्मियात तिज गुंगव तू नकोस टाळ्या टाळ पिटू गझली…

  • गोलच गोल – Round and round

    सारे काही गोलच गोल जीव तुझा रे हा अनमोल कधी कधी जर करशिल झोल करण्या भाकित एक्झिट पोल सांग पावसा बडवित ढोल उन्हास सुद्धा असते मोल जोर लावुनी खच्चुन कोल औषध माझे कडवट बोल अचुक मोजण्या कंपन डोल डिजिटल काट्यावरती तोल दार मनाचे आता खोल हो प्रामाणिक भरून टोल उतर अंतरी खोलच खोल हळूच केळे…

  • ओझेबीझे फेकुन देते – throwing away burdens

    गझल काफिया रदीफ गातो माझ्यासंगे शरीफ गातो उत्सव असुदे अथवा जलसा तीन दले धर्माला पळसा गजल लिहावी अथवा कविता शुद्ध जले वाहूदे सरिता गझल गझाला गज्जल असुदे नीर तयातिल नीतळ असुदे साळुंकी वा म्हण साळुंखी फक्त जाण तू तो तर पक्षी सुंदर देही सुंदर आत्मा हेच सांगते गाता गाता गाणे गाता बाग फुलावी शिंपुन केसर…

  • ऊठ मुला – wake up my boy)

    ऊठ मुला जागा हो सत्वर तुला जायचे बघ कामावर विधी आटपुन भल्या पहाटे प्रसन्न ताजे तुजला वाटे करून कामे लवकर लवकर घरास ये तू बनून अवखळ आनंदाने हसत राहशिल जीवन जगण्या फ़ुलशिल खुलशिल आता ना मज कुठली चिंता आत्म्यामध्ये तू भगवंता

  • धर्म दिगंबर जैनांचा – digambar jain relegion

    टिकेल आता येथे सुंदर धर्म दिगंबर जैनांचा देवघरातिल बोले झुंबर धर्म दिगंबर जैनांचा गातो पक्षी झुळझुळ वारे वाजे पावा कृष्णाचा पृथ्वीसंगे गाते अंबर धर्म दिगंबर जैनांचा तीर्थ बनविले अरिहंतांनी मार्ग दाविण्या आम्हाला आदिनाथ वा असुदे शंकर धर्म दिगंबर जैनांचा जीवांमधली ठिणगी फुलण्या सदासर्वदा दक्ष रहा जमेल तितुकी घाला फुंकर धर्म दिगंबर जैनांचा लेन्स असूदे अथवा…

  • खरेच आहे – it is true

    बुडत्याला आधार काडिचा खरेच आहे मला वाटते जुने लिहावे बरेच आहे स्वभाव अपुला आपण जपतो असेच आहे आत्मा म्हणतो जे आहे ते तुझेच आहे श्वान भुंकतो कारण त्याचे तेच बोलणे रोज भुंकणे जरी तेच ते नवेच आहे बाळ बोबडे बोले काही खिदळत नाचत कौतुक करण्या म्हणते आई खुळेच आहे क्षेत्र आपुले जपण्यासाठी धडपड असते तिला…