Tag: MARATHI LITERATURE

  • सम्यक मोळी – SAMYAK MOLEE( complete bundle)

    तीनच ओळी सतरा अक्षरांची सम्यक मोळी बांधूया झोळी लाटुया जाळीदार पुरणपोळी मूर्ती प्रक्षाळू दशलक्षण धर्म गुणांचा पाळू

  • तंबोरा – TAMBORA (tanpura haaiku)

    सहज सोपे आवडले हाइकु नकोच जोखू गोडवा राखू एवढ्या तेवढ्याने नको भडकू नको तडकू गुलाबजल शिम्पू भेगांना झाकू लाव तंबोरा जुन्या आठवणींच्या जुळव तारा समुद्र खारा आपल्यासाठीच हा मोसमी वारा चढता पारा वळिवाचा पाऊस टपोऱ्या गारा वादळ झेल हरतेस कशाला त्याच्याशी खेळ प्रेमच प्रेम भिंतीवर बसली फोटोची फ्रेम रसाळ गोड घोलवडचे  चिक्कू कशाला विकू खास…

  • हाइकु – HAIKU (light verse)

    ऐक हाइकु लिहीन म्हणते मी सात  हाइकु रचे हाइकु सुगरण बायकू गुणाची काकू जरी वाटते अवघड हाइकु घाबरू नकु लिहू  हाइकु कवितेच्या अंगणी आपण टिकू एवढे करू लिहिताना हाइकु सत्यच बकू हाइकुसाठी वेळात वेळ काढू थोडेसे चुकू प्रयत्न करू हाइकुत  हाइकु छान हुडकू

  • पान का काळे करू – PAAN KAA KAALE KAROO (why blacken the page)

    सांग मी मम पुस्तकाचे पान का काळे करू काजळीने लोचनातिल भाव का काळे करू शान माझ्या चेहऱ्याची रुंद मोठे उंच जे फक्त मजला शोभते ते नाक का काळे करू धन्य झाले तृप्त झाले संत वचने ऐकुनी झळकती ऐन्यापरी ते कान का काळे करू मी न कुठले कार्य करते मी स्वतःला तोलते तोलताना बोलताना ओठ का…

  • सारथी – SAARATHEE (charioteer)

    वादळे रोंरावताना मेघ गगनी ठाकती शेर ओढी रथ ढगांचा ‘मी’ तयांचा सारथी खेचुनी मम भाव सारे शून्य मी भासे कधी छळत राही पण अनामिक सांजवेळी ओढ ती पौर्णिमेचा चंद्र उगवे अंतरी माझ्या कधी द्यावया आतूर हाका घन समुद्री गाज ती वादळे बनतात जेंव्हा भावनांची गलबते मीच प्रज्ञा मीच प्रतिभा मी सुमेधा अन रथी बीज असुदे…

  • तरूतळी – TAROOTALEE ((beneath the tree)

    या स्थळी तरूतळी स्वच्छ सुंदर झोपडी धरी शिरी सावली गर्द झुंबर झोपडी झुलतसे बाळ गुणी पांघरोनी गोधडी अंगणी सई विणे अंगडी अन टोपडी लिहित बसे गोप कोणी उघडुनी चोपडी दूर तिथे बोलण्यात दंगलेली चौकडी नगरजन  नित्य येती वाट करुनि वाकडी

  • खरे काय आहे – KHARE KAAY AAHE (what is true)

    खरे काय आहे बरे काय आहे कळावे तुला रे बरे काय आहे तुला पाहिले मी तुला ऐकले मी तरी जाणले ना भले काय आहे गुपिते मनाची जुनी रेखताना जरा अनुभवावे नवे काय आहे नसे तू नसे मी नियंता इथे रे घ्यावा कुठे काय आहे कसा शोध किती मोह तुजला उणे शोधण्याचा अता अधिक शोधू खुले…