Tag: MARATHI LITERATURE

  • खरे स्वप्न हे – KHARE SWAPN HE (true dream)

    तुला भाजते जर मृदुल चांदणे कसे भर दुपारी असे चालणे जरी टाकवेना पुढे पावले तरी तू मनाने शिखर गाठणे इथे कार्य अर्धे करू पूर्ण ते जिवा ध्यास घेऊ पुरे छाटणे उगा कोश विणणे फुका उसवणे गगन झेप घेण्या तया फाडणे पुन्हा धीर देण्या बरे बोलुया पतंगास वेड्या नको जाळणे भुकेल्या जनांना भरव घास रे बनव…

  • सुपली – SUPALEE ( sweepings pan)

    सुकली खपली उडली खपली गहू चवीचा असली खपली रडकी कन्या हसली खपली भरण्या कचरा सुपली खपली जखमा भरता धरली खपली नकळत माझ्या पडली खपली स्वर्ग गाठण्या गळली खपली मात्रावृत्त – (४+४=८मात्रा)

  • काया अनमोल – KAAYAA ANAMOL(precious body)

    प्राजक्ताचे देठ जणु, ओठ तुझे जर्द बाई, ओठ तुझे जर्द गुलाबाच्या फुलापरी, गाल तुझे लाल बाई,  गाल तुझे लाल बागेतल्या भृन्गासम, कृष्ण तुझे नेत्र बाई, कृष्ण तुझे नेत्र सावळ्या या मुखावरी, चाफेकळी नाक बाई, चाफेकळी नाक कुंडलात शोभणारे, कान तुझे छान बाई, कान तुझे छान श्यामरंगी घनापरी, केस तुझे दाट बाई, केस तुझे दाट पौर्णिमेच्या…

  • फुलझडी – FULZADEE (sparkler)

    गझल माझी मधुर बाला वाचते बाराखडी वाचताना बरसते बघ चांदण्यांची फुलझडी चंद्र सुंदर अंबरीचा रंगलेला या क्षणी मुग्ध त्याचे रूप कोमल टिपुन घेते ही घडी तारकांचा खेळ चाले पकडण्या उल्केस या सापडेना ती तयांना खेळती मग त्या रडी ही न उल्का ही कळीरे आत्मगंधी दंगली फेकण्या जाळे तिच्यावर राज्य घेई नवगडी राज्य घेतो ध्रुव जेव्हां…

  • भेट – BHET (gift)

    पेरता मी बियाणे खरे नंबरी वृक्ष चुम्बेल आता घना अंबरी काय देऊ तुला भेट मी सुंदरी नाद हृदयातला वाजता घुंगरी शोधण्या फूल दुर्मीळ जे माणसा रानवाटा फिरे मी तळी अंतरी दावले रूप देवा तुझे मी जगा प्राण ओतून मूर्तीतल्या कंकरी मी लढे माझिया सावळ्या  मिळविण्या होउदे जीत वा अंत या संगरी वृत्त – गा ल…

  • किरण मंजिरी – KIRAN MANJIREE (ray of light and blossom)

    जाळीतुन पानांच्या उमले किरण मंजिरी सळसळणारी रविकर कुलकर करिता करणी झुळुक गुंजते झुळझुळणारी सुनेत्र उघडी भास्कर दोन्ही मिटते डोळे लज्जित अवनी नयनांमधुनी सुरेख वर्षे मुक्त निर्झरा खळखळणारी  

  • मजा – MAJAA (fun)

    जाण आता खरी ताणण्याची मजा ताणता ताणता जाणण्याची मजा ज्यास कळते पुरी लांबण्याची मजा त्यास भावे न ती खेचण्याची मजा ढील आता कशाला हवी रे तुला घे नभी वावडी काटण्याची मजा थंड ओठांवरी ठेवुनी ओठ तू लूट बर्फामधे गोठण्याची मजा सांग कारे  तुला ना कळाली कधी जिंकुनीही रणी हारण्याची मजा वृत्त – गा ल गा, …