-
भांडीभांडी – BHAANDEE BHAANDEE (pans and pots)
भांडीभांडी अन भांडीकुंडी चल भर प्यान पॉट कळसा गिंडी गंजात पाणी भरून ठेव गो प्यायाला येइ साजुक देव घो कामं किती वरी करून राह्यले तरी तुझे ना तेरा गं वाजले गाडग्यात आंबिल रटरट शिजतंय दुधाचं लोटकं भरभरुन सांडतंय संगती घेऊन सुंदर कोष्टी ये ग ये सई सांगाया गोष्टी छप्पापाणी नी सागरगोटे खेळू बिगी बिगी होऊ…
-
मस्त मस्त पावसात – MAST MAST PAVASAAT(In the wonderful rain)
मस्त मस्त पावसात सख्या फिरू वारियात पांघराया शाल हवी तनू म्हणे गारव्यात नाचू पाय आपटीत वाळूवरी अंगणात रेतीमध्ये तळपाय बुडवूया खोल आत चिमणीचा खोपा बांधू झाड लावू परसात नांद्रूकीच्या फांदीवरी झोके घेऊ झुलूयात बाजगरी ऐसपैस चल गप्पा मारुयात भिजलेल्या वाटांवरी रवापाणी खेळूयात दिसता तो फरूड गे वाघ त्याला म्हणूयात चंदनाच्या पाटावर काचापाणी खेळूयात सये चल…
-
वृक्षवल्ली – VRUKSH- VALLEE (Trees and creepers etc.)
अंगणात आल्या सरी आषाढाच्या वांड पोरी गळा मौक्तिकांच्या माळा पायी घुंगराचा वाळा पाखरांचे थवे गाती ढगांमध्ये उंच जाती जाई जुई चाफा कुंद सुगंधाने मन धुंद हवा जरी गार गार आजाराचा गेला भार फुलापरी मन ताजे गीत प्रीतीचे रे गाजे अता नाही घातपात जगू सारे मस्त शांत मधुमिलनाची घडी उमलली गुलछडी नाही अंगी कसकस जीवनात नऊ…
-
अंगण गाणे – ANGAN GAANE (courtyard song)
चलागं पोरींनो गाऊया अंगणी रांगोळी काढूया रेषेतं ठिपके मांडूया कलेकलेने जोडूया चित्रातं घरकुल सजवूया घरासं खिडक्या ठेवूया दारासं तोरण बांधूया गाईची पाऊले रेखूया गाईला गोठ्यात आणूया वासरां जवळ घेऊया दोघांना चारा घालूया झऱ्याचं पाणी पाजूया अंगणी रातीला जमूया उखाणे सुंदर गुंफूया झिम्मा नी फुगडी खेळूया चंद्राचं चांदणं पेरूया
-
काया अनमोल – KAAYAA ANAMOL(precious body)
प्राजक्ताचे देठ जणु, ओठ तुझे जर्द बाई, ओठ तुझे जर्द गुलाबाच्या फुलापरी, गाल तुझे लाल बाई, गाल तुझे लाल बागेतल्या भृन्गासम, कृष्ण तुझे नेत्र बाई, कृष्ण तुझे नेत्र सावळ्या या मुखावरी, चाफेकळी नाक बाई, चाफेकळी नाक कुंडलात शोभणारे, कान तुझे छान बाई, कान तुझे छान श्यामरंगी घनापरी, केस तुझे दाट बाई, केस तुझे दाट पौर्णिमेच्या…
-
बुदू बुदु – BUDOO BUDOO (fast fast)
-
श्रावणा रे – SRAVANA RE (” oh beautiful shravan month)