Tag: MARATHI NISARG KAVITA

  • शर्वरी – NIGHT

    संगमरवरी रात शर्वरी चरण कशाला जोड कर वरी हृदय मंदिरी ब्रम्ह हर वरी केवळ आत्मा पूज्य वर धरी ल ल ल गा ल गा पंख पर वरी

  • संकेत – SIGNAL

    संकेत बोलताती चंडोल गीत गाती वाऱ्यासवे इशारे करतात रंग साती जीवास मी जपावे मम धर्म सांगताती आला निशांत समय शोधू कळीत नाती अर्थास अर्थ देण्या समयांत प्रीत वाती

  • पंचारती – METAL PLATE WITH FIVE LAMPS

    अंगठीतले खडे शोभती पंचारती काकडे शोभती जसे शिपाई निळ्या डोंगरी तसे दुधारी कडे शोभती हिमालयावर मुनी ध्यानरत झडे नवल चौघडे शोभती चरण कमल उमटता वालुकी विटेवरी कानडे शोभती जलद “सुनेत्रा” झरुन अंगणी सुकेशरी दव सडे शोभती

  • मुनीम – ACCOUNTANT

    एक मुक्तक .. थीम नावात थीम आहे गावात टीम आहे सारा भरून सारा डावात भीम आहे … गझल … नावात थीम आहे गावात टीम आहे ..(जमीन ..मतला) भावात र्हींम आहे पावा हकीम आहे..(हुस्न – ए – मतला) सोन्यास पारखाया रावा सलीम आहे अर्थास तोलणारी आवा मुनीम आहे सारा भरून सारा डावात भीम आहे दर्यास खिळवणारा…

  • कलदार – MINT

    तेरा नि तीन सोळा गाई सुनेत्रा गझल धरते जमीन ठेका गाई सुनेत्रा गझल ललबाय रात गाते पाण्यातल्या जीवांस कलदार स्पर्श झोका गाई सुनेत्रा गझल कोनात बंद कोणी उघडून घे व्यवहार जाणून निश्चयाला गाई सुनेत्रा गझल आता कशास पाहू मागे वळून कोणा चरणात न्यास बेला गाई सुनेत्रा गझल प्रीतीत नाव कुठले देऊ “सुनेत्रा” तुला रत्नत्रयात आत्मा…

  • विराट – VIRAT(COLOSSAL)

    धुके मलमली पहाटवारा कशास वळतो चऱ्हाट वारा सुगंध ओला बनात भरुनी हळूच चुंबे ललाट वारा उधाण भरती समुद्र गर्जे तिथे करी थयथयाट वारा सुनेत्र झरती करुण रसाने जिनेंद्र चरणी पिसाट वारा कडेकपारी मधुन “सुनेत्रा” झरा जणू बघ विराट वारा

  • वाईच – SPARING

    वाईच ….. एक मुक्तक ! वाईच शब्दामधल्या ‘च’ चा अर्थ अल्पसा वाईच शब्दांमधील ‘च’ हा नसे भरीचा महाबळेश्वर सवे पाटण निसर्ग सुंदर ,,,, वाईच फक्त न .. जावळीसह मेढासुद्धा !!!