Tag: Marathi Nisarga-kavita

  • दुहिता – Daughter, River

    भूमीताई सांग कसे मी होऊ तव उतराई तुझ्या क्षमेची दिगंत कीर्ती गाते दुहिता माई निर्झर बाळे अवखळ पेलत अंगाखांद्यावरी शुद्ध नीर साठवण्या ह्रदयी खळगे ठाई ठाई तलाव विहिरी धरण सरोवर समुद्र सागर ओढे तव कायेवर आश्रय घेती तू तर त्यांची आई सातपुडा सह्याद्री मांगी विंध्य हिमालय तुंगी सम्मेद शिखर कैलास गिरिची तू माता बाई नंदनवन…

  • हे झाड सांगते गुज मला ! – “This tree is telling me its secrets”

    हे झाड सांगते काय मला `.. कथा सांगते जणु मजला.. गुजगोष्ट सांगते  मला… पानांच्या ओठातुन हसते..हळुवार सळसळते सांगते.., ” या दगडी भिंतींचा भक्कम शेजार मला! प्रभातीस हे ऊन कोवळे ..भाद्रपदातील .. खेळते बागडते माझ्या देहावरती ..या दगडी भिंतींवरती.. इथल्या भूमीच्या कणकणावर …मुक्तपणे…! हवा वाहते शीतल झुळझुळ … परिमल भिजल्या पानफुलांचा…ओल्या खोडांच्या सालीचा .. अन मातीचा…

  • सुखद गारवा – “pleasant coolness”

    पीत गुलाबी दल पर्णांकित खोड उभे पाठी नाजुक कुसुमांच्या रंगांच्या सोडविण्या गाठी झाड फुलांनी भरून गेले पानांची गर्दी हलवुन फांद्या मीच पाडला पाऊस माझ्यासाठी भल्या पहाटे सुखद गारवा हवा लपेटुन तना भिजल्या वाटेवरुन जातसे गात पुढे मी मना मना तुझिया संगे करते मी गप्पागोष्टी मोर कोकिळा साद घालती संवादासाठी चला उमटू द्या अंतरातुनी हवेहवेसे गीत…

  • सुपारी – BETEL NUT

    तुझी चूक तुजला कळाया हवी तुझ्या अंतरी सळसळाया हवी किती दिवस अजुनी तुझा घोळ हा तुझी जून वांच्छा जळाया हवी लवंगांत चिकनी सुपारी कळी तुझे पान ताजे वळाया हवी नयन नेत्र लोचन उमलण्या पुरी तुझा मान जपण्या तळाया हवी झरा निर्झराला मिळोनी नदी तुझ न गाव पण खळखळाया हवी

  • पाऊस गाणे – PAAUS GANE (SONG OF RAIN)

    निळ्या सावळ्या तळ्याच्या काठी पाऊस बघत उभे रहावे झरझरणाऱ्या धारांसंगे पाऊस गाणे गात रहावे कृष्ण धवल बदकांचे ढंग डोळे भरून पहात काठावरच्या वटवृक्षांचा चिंब कचभार उदवून द्यावा पिवळ्या फुलांच्या झुडुपामागे वाघोबाचा भास व्हावा असा पाऊस असे तळे स्मरणामध्ये साठवून घ्यावे कागदावरती चित्र रेखून त्यात सुंदर रंग भरावे

  • शुद्ध भावे – SHUDDH BHAVE(WITH PURE MIND)

    विठू माऊलीचा लळा तुळशीची माळ गळा .. रखुमाई जाणतिया अंतरीच्या भक्ता कळा.. मन गुलाबी पाकळ्या गुलाबाचा गंध जळा… पाकळ्यांत भिजलेला पाकळ्यांत भिजलेला… . टपटप ओघळती थेंब काठी घळाघळा… एक एक मणीजसा स्फटिकाच्या माळेतला… पाकळीच्या काठावरी थेम्ब मणी गोळा झाला … चातुर्याने ठिबकला जलतरंगात आला… शुद्ध भावे वलयात जाई किनाऱ्यास गात … … .

  • दंगा – DANGA( HUBBUB)

    जाग सख्या पांडुरंगा झुंजूमुंजू झालं सोनियाच्या रथातून सूर्यदेव आलं पूर्वदिशी केशरात जगन्नाथ न्हालं … चैतन्याच्या पावसात देऊळात धावा पंढरीचा विठुराया भेटायला यावा थवा पाखरांचा उडत वाळवंटी आला … प्रभातीच्या किरणात स्नानासाठी आला…. पंढरीची चंद्रभागा भीमा आधी नाव धुते पाखरांचे पंख पुसे गाव भाव दर्शनास माऊलीच्या रखुमाई आतुरली….. धूत पंख लेऊनीया मंदिरी पातली.. मंदिराच्या कळसाला सोन्याचा…