विठू माऊलीचा लळा
तुळशीची माळ गळा ..
रखुमाई जाणतिया
अंतरीच्या भक्ता कळा..
मन गुलाबी पाकळ्या
गुलाबाचा गंध जळा…
पाकळ्यांत भिजलेला
पाकळ्यांत भिजलेला… .
टपटप ओघळती
थेंब काठी घळाघळा…
एक एक मणीजसा
स्फटिकाच्या माळेतला…
पाकळीच्या काठावरी
थेम्ब मणी गोळा झाला …
चातुर्याने ठिबकला
जलतरंगात आला…
शुद्ध भावे वलयात
जाई किनाऱ्यास गात … … .