-
पायवाट – PAAYVAAT
मोहरीच्या रानामध्ये रंग हळदीचा खुले वारियाच्या झुळकीने मोहरली फुलेफुले कोण बरे जाई पुढे घडवुनी पायवाट रंग मातीचा मनात लोचनात स्वप्न घाट रान सारे हासणारे पुढे शांत हिरवाई तिथे असावी झोपडी अंगणात जाई जुई किलबिल पाखरांची मोद हसे ठाई ठाई
-
शुभ्र निळाई – SHUBHRA NILAAI
In this poem ‘Shubhra Nilai’, nature’s beauty is described. The beauty of streams, waterfalls, a clean blue sky and greenery is portrayed. जिथे पहावे तिकडे निर्झर, खळाळणारे प्रपात निळसर .. आकाशाची शुभ्र निळाई, हसते सृष्टी दिसते सुंदर! जिथे पहावे तिकडे हिरवळ, फुलाफुलांचा मनात दरवळ … आगिनगाडी झुकझुक चाले, हसते धरणी खळखळ खळखळ!!
-
जिनवाणी ‘बोलू’ – JINAVAANEE ‘BOLU’
कुंकुमवर्णी गडद गुलाबासम सुंदर कांती जर्बेरा अन शेवंतीची कुंतलात फांती पद्म पाकळ्यांवर भृंगांसम नेत्री तेजप्रभा आम्रफलासम मुखकमलावर नाकाची शोभा भृकुटी दोन्ही तोल साधण्या वळणदार वेली ओठ टपोरे बदाम लालस गालांवर चेरी पिंपळपाने दोन कर्ण अन कुंडल जास्वंदी बकुळ फुलांची नाजूक रेखिव भाळावर बिंदी घटपर्णी डौल गळ्याचा सर प्राजक्ताचा पदर उन्हाचा हळदी रंगी स्पर्शे सहज नभा…
-
शिशिर ऋतू मी शिशिर ऋतू – SHISHIR RUTU MEE SHISHIR RUTU
शिशिर ऋतू मी शिशिर ऋतू मम ह्रदयाचे पाच ऋतू घर बर्फाचे बांधुन मी तयात बघतो राहुन मी कधी झोपतो निवांत मी म्हणत वसंत ये ये तू संगे त्याच्या बागडतो वठली खोडे पालवतो वाद्ये मंजुळ वाजवतो गीष्मासंगे जात उतू कुंकुम वर्णी निसर्ग हा हिरवाईने नटे धरा खाउन आंबे फणस गरा म्हणतो वर्षे कोसळ तू मीच धबधबा…
-
सजग कहाणी – SAJAG KAHAANEE
पृथ्वी पाणी, अंबर वारा सालामध्ये, महिने बारा चैत्र आदि जर, अंत फाल्गुनी पुनश्च फुलवी, सतेज अग्नी सुरू कराया, नेत्र दिवाणी सहा ऋतूंची, सजग कहाणी वसंत देई, वासंतिक क्षण हसते फुलते, अवघे तन मन ग्रीष्मामधली, ग्रीष्म झळाळी पांगविते घन, छाया काळी वर्षा धारा, वर्ष सजविते बीज तरू फळ, शेती जपते हेमंतातिल, हेमश्रीमंती प्रदान करिते, भूवर शांती…
-
बारमास गीत – BAAR-MAAS GEET
चैत्रात उधळे नाविन्य कोणी वैशाख खोदतो कांचन खाणी ज्येष्ठोबा गातो पावन गाणी आषाढ दिक्पाल रावण मानी रंगात भिजणार श्रावण राणी भादवा हासतो जिंकुन ठाणी धान्याच्या भरेल आश्विन गोणी दिव्यांनी सजणार कार्तिक वाणी मार्गशीर्ष बांधे तोरण पाणी पौषात लुटावी गुलाब दाणी माघात लाघव लावण्य मौनी सुनेत्रा रंगीत फाल्गुन सोनी मात्रा-अठरा(१८)
-
जाळीतुनी धुक्याच्या – JAALEETUNEE DHUKYAACHYAA
जाळीतुनी धुक्याच्या सुप्रभात पाऊले टाकी तिज भास्कर चाहुल देतो उठवीत दिशांना दाही किरणशलाका हळदी प्राचीवर कुंकुम उधळे मेघना मुग्ध बाला तलम ओढणी घेते घाटांची मोहक वळणे नववधू जणू सजणी दागिने फुलांचे ल्याली नाकात वेलीची नथनी झुळझुळे खोडकर ओढा काठावर हिरवी राने पाण्यावर नीतळ शीतल सोनेरी झुकती किरणे सूर्याला वंदन करती पोपटी कोवळी पाने वाहतो सुगंधी…