Tag: Marathi Nisarga-kavita

  • दुलई – DULAI

    नववर्षाचा हरेक दिन हा … नित्य नवी मज देतो ऊर्जा… सूर्य उगवण्या आधी माझी … सळसळण्या बघ लागे ऊर्जा .. . काय लिहू मी आज नवे रे.. चैतन्याने भरून वाहण्या … ? प्रश्न मला हा कधी न पडतो… …. … …. .. .. . .. . .. .. साकी भरते माझा प्याला…. साकी भरते माझा…

  • क्लीक – CLICK

    कशास करु मी क्लीक कुठेहीछायचित्रे मिळवाया…प्रसन्न साकी माझ्यावरतीसृष्टी सुंदर दावाया….कशास फोटो पाहू आतातूच ठाकता पुढ्यात रे…ओढ निसर्गा तुझीच मजलातुझ्या मनाचा फोटो दे…. मित्र सखा अन ईश्वर गुरु पणनिसर्ग आहे मनुजाचा …हवीच साकी जिनवाणी ममस्फुरण्यासाठी काव्याला … मला न चिंता भीती कसलीनिसर्ग देवा तुझ्यासवे…अंतरीचा जिनदेव दाखवीबिंब मनोहर तुझे खरे … सूर्योदय सूर्यास्त पाहतेरोज तरीपण नवा नवा…

  • पुफ्फ – PUFFA

    🌺 काल जाता जाता एक गीत लिहीत मी गेलेकाल परवाची गोष्ट गीतातून भरे प्याले 🌺 🌺 प्याले म्हणू वा ते पेले जरी काचेचेच होतेत्याला चषक म्हणता नाजुक किणकिणले 🌺 🌺 अष्टक्षरी ओवली मी करू अष्टक मंदिरीतबकात अष्टद्रव्ये पूजेसाठी सजविली 🌺 🌺 नीर प्रासुक अक्षत गंध चंदनी खोडाचासुगंधित पुफ्फ शुभ्र चरु खडीसाखरेचा 🌺 🌺 दिव्व धूप…

  • माधुर्य – MADHURYA

    माधुर्य चंद्रम्याचे किरणांत पारिजातअरिहंत देव प्रतिमा पुष्पात पारिजात फुलला सुवर्ण चाफा झेंडू गुलाब बूचमृदगंध बकुळ प्राशे परसात पारिजात मम माय धार काढे चरवीत दुग्ध धारघन रास माणकांची लक्षात पारिजात पाऊसधार गाते गातोय कल्पवृक्षमोती नि पोवळ्यांचा हस्तात पारिजात जास्वंद कुंडलांची डुलतेय माळ सिद्धताठ्यात गुलछडीसम बहरात पारिजात

  • रेनकोट – RAINCOAT

    रेनकोट या दिवाळीत मी असा निराळा घेईन रे …काठ जरीचे नसतील त्याला काठी घुंगुर माळा रे….. धुंवाधार पाऊस पडताना घालून तो मी मिरवेन ..छुमछुम त्याची ऐकत ऐकत पाऊस गाणी रचेन ग … थेंब टपोरे टपटप झरतील घुंगरातुनी झरझर रेत्या नीरातून भूमीवर मग अंकुर रुजतील हिरवे रे … रंगबिरंगी दीप उजळता काव्यातून मम अंतर रे ..उजळून…

  • अंगी – ANGEE

    कपड्यांची ना तंगी ओळखकट्यार लखलख नंगी ओळख समोर डोंगर जमाल बाबूरम्य कुटी मम जंगी ओळख गिरिबाळांचे स्नान जाहलेमृदुल पोपटी अंगी ओळख अनेकान्त शैली स्याद्वादीधारा सप्तम भंगी ओळख भद्र भाव घन कळस चुंबितीश्वासांची नवरंगी ओळख

  • गहिवर – GAHIVAR

    अक्षर अक्षर तापवले ..प्राण फुंकले श्वासामधुनी .दवबिंदूंनी त्यांस शिंपले…परिमल घेऊन झुळूक आली ..सुरभीत झाली शब्दफुले …लहर नाचली वाऱ्याची ..अनगहिवर आला भाव भरायादहिवर जैसे ..शेतामधल्या साळीवरती…सृष्टिमाता प्रसन्न हसली…खुद्कन गाली…गालावरच्या खळीत तिचिया..अंकुरले बीज.. ओले..भिजले…हळू हळू ते रुजले खुलले..पर्णांच्या जोडीतून हसले…प्रकाश पाणी वाऱ्यासंगे ..तरू वाढले…सुगंध उधळत फुले उमलली …फुलाफुलातून रसमय सुरभीत ..पक्व फळांची बाग बहरली…रात्र चांदणी गात बरसली..पहाटवाऱ्यासंगे…