Tag: Marathi Nisarga-kavita

  • कुल्फी – KULFEE

    दुपार झाली आला कोणी विकावयाला गारेगार दुधी गुलाबी कुल्फी कांडी बनवुन चटपट चारे गार सायकलीवर उन्हात फिरुनी थकून होता घामेघूम गच्च ढगांची नभात दाटी सुटले अवचित वारे गार गरगरणाऱ्या वावटळीवर मजेत पाचोळा उडतोय ऊन बैसले झाडाखाली पक्ष्या गाणे गा रे गार मेघ कशाला गडगड करती .. वीज कडाडत दळते काय अता न असले प्रश्न तपविती…

  • काव्यकुंज – KAVYA KUNJA

    काव्यकुंज …. रंग हळदीचा पिऊन पाने देत सावली उन्हात हसती सान बालिका उभी तरुतळी बघते आहे वाट कुणाची गप्पा गोष्टी करावयाला अधीर आतुर उभी कधीची जर्द लाल पोशाख शोभतो डोईवर टोपी छायेमध्ये सुबक बाकडे निवांत बसलेले ऊन त्यावरी तप्त दुपारी खुशाल निजलेले… …… आकाशाची गर्द निळाई जांभुळलेली पिवळी राई मातीमध्ये ऊन खेळते रागवते आई… निळी…

  • कलश – KALASH

    भाव शुद्ध अर्पिते प्रभूला प्रभूसम होण्या ओंजळ भरली शुभ्र फुलांनी अर्घ्य वाहण्या जाई जुई प्राजक्त मोगरा विपिनी फुलला सळसळणाऱ्या नवपर्णांनी पिंपळ सजला निसर्गातले रंग उधळण्या वसंत आला आभाळातून कलश घनांचा झरू लागला सृष्टीमातेच्या चरणी मम माथा झुकला

  • सांज गोरीमोरी – SAANJ GOREE MOREE

    किती ऊन सोने सांडते उन्हाळी काया घाम गाळे वेचून वेचून उन्हाचे चांदणे उन्हाचा पाऊस पेरण्या अक्षरे लेखणी झरेल ऊन सावलीत सावली उन्हात सावली रापते गव्हाळते ऊन झाकोळता नभ ऊन काळवंडे गर्द कडुनिंब त्याला वारा घाले गोधन गोठ्यात वाहने सुसाट उंबऱ्यात बाळ पाहतेय वाट ऊन काळगेले सांज गोरीमोरी धुळीत खेळून उभी शांत दारी संधिकाली तूप साजुक…

  • अधिक अधिक – ADHIK ADHIK

    जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया …. गात्रांतुन कडकडती वीज खेळवाया सैराटी वाऱ्यातुन धूळ येय गाया …. जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया …. मातीने माखुनिया देहगंध जाया अंगांगी जलदांतिल धार नाचवाया… जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया … कुष्णधवल मेघांची ऐसपैस छाया तप्त लिप्त भूमीवर पांघरून घ्याया… जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया ….…

  • झेप – ZEP

    निळसर अंबर चाफा कोमल कळ्याफुलांची झेप नि परिमल झळके वनराई … मोद विखरुनी ठाईठाई .. झळके वनराई … चिंब चिंबल्या फांद्यांवरती चिमणपाखरे किलबिलणारी झुले लता जाई … मोद विखरुनी ठाईठाई ..झुले लता जाई … रानफुलांचा हळदी वाफा तृणपात्यांचा हिरवा ताफा गझलगीत गाई.. मोद विखरुनी ठाईठाई ..गझलगीत गाई मुग्ध रक्तिमा अधरी गाली भाळावर पूर्वेच्या लाली सळसळे…

  • मंत्र साखरी – MANTR SAAKHAREE

    उडती फुलपाखरे मजेने पंख पसरुनी अवतीभवती फुलाफुलांतिल मकरंदासव गंध उधळुनी अवतीभवती सानथोर जीवांनी साऱ्या सुगंध प्यावा आनंदाने सृष्टी जपण्या मंत्र साखरी जपत रहावा आनंदाने झिंगुन वाऱ्याने लोळावे तृणपात्यांच्या अंगांगावर गवतफुलांनी नाचत गावे तृणपात्यांच्या अंगांगावर मोरपिसाचे कलम सरसरा उखडत जाते भयास जर्जर अक्षररूपी ठिणगी जाळे अंधरुढींच्या भुतास जर्जर असे लिहावे तसे लिहावे नकाच सांगू मला कुणीहो…