Tag: Marathi Nisarga-kavita

  • गजरा – GAJARAA

    गडद निळे गडद गडद आभाळ सावळे झाले काळ्या काळ्या जलदांनी नभ भरुनी आले मौक्तिक माळा घालुन सजल्या श्याम मेघना शीळ घालतो मारुत मंजुळ खग घेती फांदीवर ताना झरझर झरझर झरती धारा टपटप टपटप पानांवरती मुदगंधाचा सुगंध प्राशुन शब्द उधळले पानांवरती गोळा करुनी शब्द अंजलीत टपोर गजरा कुणी बनविला माय आठवे सुंदर माझी तिनेच गजरा असा…

  • प्रिय प्रिय मजला – PRIY PRIY MAJALAA

    मी न घालते नियम दुजावर बंधन घाले मी माझ्यावर माझा संयम प्रिय प्रिय मजला माझ्या सौंदर्यावर भुलला अस्त्र लेखणी भेदुन लक्ष्या जाळ्यामध्ये पकडे भक्ष्या शस्त्र लेखणी फिरे मनावर काळी शाई झरते झरझर जलद सावळा बरस बरसतो भाव भावना झिमझिम झरतो अक्षर अक्षर उजळत जाते त्यात लख्ख ब्रह्मांड झळकते

  • उत्तम मार्दव – UTTAM MAARDAV

    कोमल जल खडकांस कापते तैसे मार्दव सृष्टी जपते… फुलाप्रमाणे मृदू बनावे गुणानुरागी सुरभित व्हावे….. हृदयपाकळ्या उमलुन येता झुळकीवर हलके लहरावे,…. चंद्रकिरण प्राशून कुमुदिनी जैसी फुलते … मुनीमनातील वचने स्मरुनी आपण गावे…. आजचा दिवस उत्तम मार्दव…. सर्व साधर्मि बंधु-भगिनींस उत्तम मार्दव धर्माच्या हृदयपूर्वक शुभेच्छा !!!

  • क्षमाशील यक्षिणी – KSHAMAASHEEL YAKSHINEE

    कमलासनात लक्ष्मी.. पद्मावती देवी… खळाळणारा झरा.. प्रपातातही देवी…. गणेशरूपी ऋद्धी.. मंतर गुणी सिद्धी घडा जलाने भरते.. जिंकुनी घन युद्धी ङ्ग् वांङ्मय जणु चंद्रमा.. मूर्त कैवल्याची कमलासनात लक्ष्मी …………कमलासनात लक्ष्मी ………… चरखा फिरतो गरगर.. सूत कातण्या छान छबी आरशातली.. पाहुनी गोरी पान जटाभार डोंगरी.. त्यातून ठिबके नीर झरा बनुनी धबधबा.. सांडतो धवल क्षीर ञ ञकार हे…

  • चल चल पृथवे – CHAL CHAL PRUTHVE

    चल चल वाऱ्या माझ्यासंगे वेळुबनातुन धावायाला शीळ घाल तू साद द्यावया … माझ्यातिल लपल्या गाण्याला…. चल चल पाण्या माझ्यासंगे झरा होउनी बागडण्याला खळखळ खळखळ मुक्त नाच तू… माझ्यामधली प्रीत नाचण्या चल चल बिजले माझ्यासंगे मेघांमधुनी कडाडण्याला चाबुक फिरवित कडाड वीजे … माझ्यामधुनी वीज फिराया…. चल चल आभाळा मजसंगे क्षितिजावरती झुकावयाला झुकता झुकता हळू चूंब तू…

  • म्हातारी – MHAATAAREE

    आले आले वादळ वारे उडतो पाचोळा भिजावयाला चिंब पावसी मन झाले गोळा काळे काळे मेघ दाटले पश्चिम क्षितीजावरी संथ मंद वाऱ्याच्या झुळकी झुळझुळती भूवरी नभात पक्षी उडू लागले गाठाया झाडे घरट्यामध्ये परतून आली किती चिमणपाखरे सैरावैरा धावत धावत ढग झाले गोळा भरून गेला आभाळाचा फलक निळा सावळा सुटले वादळ देत इशारा झाडांना अवघ्या खिडकीमधुनी शिरला…

  • आधी वादळ – AADHEE VAADAL

    आधी वादळ मुक्त फाकडे नंतर गारा… घाल साकडे … घाल साकडे वळीवाला तू … येताना तो ऊर धडाडे मेघ धावतील सैरावैरा … बिजलीचा मग चढेल पारा … कडाडता ती फुटुन हुंदके … जलद स्फुंदतिल हलके हलके काही धारा काही गारा… मौन मूक होइलग वारा … तप्त धरेवर बरसत बरसत… गाईल गाणे पाऊस नाचत मृदगंधाचा सुगंध…