Tag: MARATHI POETRY

  • तरीही – Still

    भर बाराची वेळ तरीही कोकिळ ताना घेय तरीही कुठे कावळा क्रो क्रो करतो जुनाट वाहन वेग तरीही चिकचिक दलदल अवती भवती खातो कोणी भेळ तरीही शिट्टी वाजे कुठे कुकरची शिजे चुलीवर पेज तरीही कार कुणाची पुढे न जाते उघडे आहे गेट तरीही पदर उडे हा वाऱ्यावरती कुणी पकडते शेव तरीही माप सुनेत्रा तुझेच असली शेवटचा…

  • बेला सुंदर – beautiful time

    सांज समय बेला सुंदर उजळ आत्मियाचे मंदिर निरांजनी तूप स्नेह पूर्ण त्यात भिजव वात पेटवून शुभ्र ज्योत णमोकार मंत्र म्हणत भजन म्हणू खास खास विरण्यास भ्रम भास चित्त ठेव चैतन्यात कैवल्याच्या चांदण्यात डुंब ज्ञानसागरात रमव मन दर्शनात सांज समय बेला सुंदर रम्य आत्मियाचे मंदिर

  • शेम शेम – SHAME SHAME

    प्रेम-लग्नात हुंडा-बिंडा, हे कसलं प्रेम जबरदस्तिने देह-संबंध, म्हण शेम शेम उलटी टीप अन धावदोरा, इथे न चाले पिको यंत्रास बाजुला ठेव, घाल बरं हेम मराठी खरी दिलदार परी, इंग्रजी म्हणे “आली आली” म्हणता म्हणता, करे “कम केम” माय मऱ्हाटी बहिणाबाई, कानडीचीगं कन्नड मराठी सीमेवरी, बोलुया सेम गुजरांचा केम छे केम छे, सर्वांना कळे आट खेळ…

  • कालसर्प – “serpent of time defect”

    राहू-केतू कुंडलीतना मनात अपुल्या आहे कालसर्प हा पत्रिकेत ना विकृतीत आहे कशास पूजा निवारणाला दोष मतीतच आहे सम्यकत्वी जो असतो त्याला वीष न असले चढते मिथ्यात्वाचे पालनपोषण अज्ञानाने होते अज्ञानाला दूर करूया धर्म खरा जपण्या सम्यकज्ञानी शूर वीरांची चारित्र्ये फुलण्या

  • कॅमेरे – CAMERAS

    बास झालं लिहिणं बिहिणं चल आता हुंदडायला अंगणातल्या झाडावरचे पिवळे गुलाब मोजायला उमलते गुलाब टपोऱ्या कळ्या खिदळतात हसतात वेड्या खुळ्या डोळ्यांचे कॅमेरे दोन दोन फुलांचे फोटो घेतंय कोण हिरव्या पोपटी पानांवर गुलाबाच्या गालिच्यावर प्रेम तुझं नि माझं हसतंय पाकळी पाकळ्यांवर तेवढ्यात आल्या कित्ती बाया साळकाया अन माळकाया फुलं तोडून पसार झाल्या माझं हसू घेऊन गेल्या…

  • नीतळ चष्मा – Clear glasses

    टाक झाडुनी वाकुन वाकुन पाला पाचोळा स्वच्छ कोपरा बघून त्याला कर लवकर गोळा ढीग पडे हा झोपाळ्यावर धुतल्या वस्त्रांचा नकोस घालू घड्या बिड्या तू कर चोळामोळा नीतळ चष्मा घाल धुळीतिल करताना कामे उडता कचरा डोळ्यामध्ये धू लवकर डोळा दगडासम बघ तनमन झाले जागी हो आता झोके देण्या मनास सखये बांधच हिंदोळा गाई गुरांना खाण्यासाठी बनव…

  • दूत – messanger

    पावसाचे दूत आले उठव रे अता पाले जागा भिंती छप्पराची जिथे वाळू अंगणाले झाडझूड स्वच्छ कर रांगणारे बाळ चाले चहा कर आम्हासाठी ठेचूनिया घाल आले करायचे खूप काही नको म्हणू झाले झाले हाक मार प्रेमाने तू सून म्हणे आले आले लेक आणि जावायाला सांग ठेवायला भाले मानपान कर नीट आले सारे साली साले सुनेत्राचा गोतावळा…