Tag: MARATHI POETRY

  • गारवा – COOLNESS

    तन भिजलेले वस्त्र सोवळे ऊन कोवळे सुखद गारवा सुकवाया मन ऊन कोवळे ..ऊन कोवळे सुखद गारवा चिंब भावना टपटपणाऱ्या शब्दांमधुनी झरझरणाऱ्या काव्यसंपदा जलद सावळे ऊन कोवळे सुखद गारवा जिनालयावर कळस तीन घन रत्नत्रय जणु अमूल्य हृदयी धूत वस्त्र नव फिकट जांभळे ऊन कोवळे सुखद गारवा नेत्रांवरती बांधुन पट्टी न्यायदेवता न्याय तोलते जिनशासन पण नसे आंधळे…

  • झाड – Tree

    मन शांत शांत झाले .. आभाळ रंग वर्षत रंगून तृप्त झाले.. शरदातल्या पहाटे मन हरित कंच झाले.. लिहू काय आज आता उमगे न मम मनाला इतुके भरून झरूनी मन चित्त शुद्ध झाले .. झाडांत झाड डोले …बहरून सोनचाफा… वाऱ्यावरून आला आला सुगंध आला घेऊ किती भरूनी श्वासात गंध दरवळ.. झाली दुपार तरीही करते पहाट सळसळ…

  • उदक – Water

    नऊ रस काव्यातील झरले .. नऊ जिनायतनी रमले .. उगाळ मात्रा बारा सोळा अंदाजाने उदक गाळुनी शिम्प झारीने .. कोरफडीवर ! फुलतील पर्णे कडा कंटकी ……. रसरसलेले पर्ण गराने … किती औषधी ! जाण तयातील तप गुण वृत्ती! अर्थ काढण्या मम काव्यातील .. नव कैफियत मुख्यार्थाची… एक सरळ रेषा असते रे मोक्षगामी निश्चयाची,,,,, अल्प स्वल्प…

  • धवल गान – Pure Heart’s Songs

    नवरात्रीचा सण सौख्याचा नवधन निर्मितीचा घटस्थापना भूमीवरच्या घटात करण्याचा नऊ रात्रीचे रंग गंध रव स्वाद स्पर्श जपण्यास विजया दशमी होय साजरी दशदिशा सजण्यास दसरा झाला हसरा बाई हास निसर्गा झरा होऊनी दुहितेला कर जलदायिनी वाहत खळखळुनी पक्षी गाती जंगल करण्या मंगलमय अवघे चला जाऊया फिरावयाला हृदय घेऊनी संगे पुनव पौर्णिमा कोजागिरीची सयी तुझ्या आई धवल…

  • बारसभा – Twelve Assemblies

    हे समवशरण भगवंताचे जिन तीर्थंकर भगवंताचे बारसभा भवताली भरली भगवंताची वाणी खिरली अठरा भाषा उपभाषांतुन गणधर करती सहज निरूपण सर्वांगातुन झरे शांतरस रत्नत्रय प्राप्ती होण्यास्तव मिथ्यात्वाचा नाश व्हावया जिनवाणीचा गाऊ महिमा

  • मिस यू – Miss You

    कमरेला मी तुझा पुढाऱ्या कसा बांधुनी आज मिरवते कंबर कसण्या गाळ उपसण्या करी लेखणी बाज मिरवते कर्म बांधले आजवरी जे मला न चिंता बिंता त्याची गळ्यात काळी पोत आणखी जळणाऱ्यांची लाज मिरवते पोतराज अंगणात नाचे मारित फटके स्वतः स्वतःला पोत्यांचे पोतेरे त्याचे डोईवरचा ताज मिरवते संगमरवरी ताजमहाली बसून बेगम गझला लिहिते दुधी असूदे अथवा काशी…

  • दुपार मौनी – Silent Noon

    झुकझुक गाडी मजेत धावे इंजिन घाली शीळ वळणावरती झुळझुळ वाऱ्या तुझी अंतरी शीळ सळसळणाऱ्या चाफ्यावर भुंग्यांचा भिंगत फेर कीड फुंकण्या पाकळ्यातली आली ओठी शीळ सुगंध ओल्या मृदेत भरण्या बकुळ फुलांचा सडा शिंपित जाई झुळूक शीतल घुमते कानी शीळ लाल गुलाबी धवल जांभळी सुमने फुलली छान रानपाखरू झुलत घालते फांदीवरती शीळ ऊन हिवाळी घाम काढते दुपार…