Tag: MARATHI POETRY

  • श्री राम – SHREE RAAM

    वाईट वाम नाही वंगाळ दाम नाही डावेच ते म्हणाले त्यांच्यात राम नाही श्रीराम मौन आजी जयकार काम नाही हलल्याविना कुणाला फुटणार घाम नाही बघ लाल रेष आली म्हणतात साम नाही

  • बुत – BUT (IDOL)

    मजबूत वीण धार गझलेतल्या शरांत मजबूत पुष्प हार गझलेतल्या शरांत रांगेत कैक चोर ओळीत सांड भार मजबूत हात चार गझलेतल्या शरांत कोंडून मांजरांस वैदू जुना पसार मजबूत बांधणार गझलेतल्या शरांत भरगच्च बांगड्यांत पेरून बिल्वरांस मजबूत बुत अनार गझलेतल्या शरांत मम लेखणी धरी सुनेत्रा वही समोर मजबूत कलमकार गझलेतल्या शरांत

  • वाघीण – VAGHIN (TIGRESS)

    वाघीण बैसलेली चित्रात एक शांत आकाश चन्द्र शीला झुंजार लेक शांत मौनातल्या गुहेचा आधार कोण सांग सत्यास कोण वाली देणार चेक शांत लेकास ल्योक बोली भाषेत शब्द जाण त्या इंग्रजी तळ्याला म्हणतात लेक शांत कोणास आठवेना केलेय पाप मोप त्याला न माप काही खातीच फेक शांत चोरी इथे पहाटे करतात शब्दचोर करतातअंधभक्ती करिती रिमेक शांत…

  • प्राणी – PRANI(ANIMALS)

    आषाढ संपला ना आहे अजून बाकी येणार श्रावणाची धारा स्मरून बाकी कोणास वेध लागे गोणी भरावयाचा करण्या वसूल मरमर ठोके धरून बाकी अंदाज हावऱ्यांचे भोगात साठलेले कर्मे कुटील नीती दारी सजून बाकी निंदा टवाळ खोरी खात्यात परतलेली चोरी कशाकशाची बघ आठवून बाकी कल्याण तव कराया बसलेत दोन प्राणी लावून पाय पळ तू विसरून धून बाकी

  • स्वतः – SWATHA(MYSELF)

    स्वतः स्वतःवर करते प्रेम स्वतः मुलांवर करते प्रेम हृदय फुलांचा दरवळ घेत स्वतः जगावर करते प्रेम तनामनासह बुद्धी साक्ष स्वतः जिवांवर करते प्रेम जरी कुणाला वाटे धाक स्वतः गुणांवर करते प्रेम बुडवुन लज्जेस सुनेत्रात स्वतः जिनावर करते प्रेम

  • दूत- DUT(MESSANGER)

    आषाढ योग वर्षा मेघांत दूत आहे क्षितिजावरून येतो जलदांत दूत आहे काव्यातल्या स्मृतींनी बघ प्रीत रंगलेली मम प्राण सांगतो मज प्राणांत दूत आहे नक्षत्र श्रवण आहे पंचांग एक लिहिते बांधीव सन्मतीच्या अंकांत दूत आहे गुंफीत अक्षरांचे सूत्रात लक्ष मोती येई अवस दिव्यांची दीपांत दूत आहे नुरली मनात शंका शंखास फुंक वाऱ्या धर ओंजळी सुनेत्रा हातांत…

  • इगो – EGO

    गुरू पौर्णिमा झाली आज धन्य जाहला वाली आज दिवा लाविता जिनालयात शांत भासते काली आज धूप जाळता प्रहरी दोन सुरात स्वर लय ताली आज भरली रक्षा दाणेदार न झरले आसु गाली आज अंक अक्षरांचा बघ खेळ किती बदलल्या चाली आज असल्या खेळा उखडुन टाक रक्षण करण्या ढाली आज जिनेश्वरावर श्रद्धा ठाम इगो कुणाचा खाली आज