-
सातबाराचा उतारा – SAAT BARACHA UTARA (THE 7/12 EXTRACT)
पाच बारालाच लिहिला सातबाराचा उतारा माझिया हाती धरेचा सातबाराचा उतारा मी जरी शाईत काळ्या बुडवुनी टाकास लिहिते सप्तरंगी रंगला हा सातबाराचा उतारा काल होते चार बारा आज आहे पाच बारा बघ सहा बारा उद्याला सातबाराचा उतारा पुण्य मातीचे फळोनी मोतियासम अक्षरांचा मज मिळाला हा चिठोरा सातबाराचा उतारा टोलवीले कैक वेळा आज पण ते शक्य नाही…
-
स्प्लेंडर – SPLENDOR(GREAT BEAUTY)
झिंग झिंगल्यावरती थिरकत फुगडी सुंदर एक सांडली सोलापूरी बुगडी सुंदर पवन मावळी उद्यम नगरी गाव भोसरी पिंपवडातिल प्राधिकरण अन निगडी सुंदर फेटे टोप्या हेल्मेटच्या गर्दीमध्ये उठून दिसते मस्त पुणेरी पगडी सुंदर शाहूनगरी भटकायाला भारी वाहन जुनी तरीही स्प्लेंडर आहे तगडी सुंदर लेकीबाळी नटून बारामतीत फिरती विकावयाला सुबक बोळकी सुगडी सुंदर मम् गझलेच्या जमिनीवरती पाय रोवुनी…
-
शाल – SHAWL
-
ओखी -OKHEE
ज्या गुलाबी वादळाचे नाव ओखी त्या नबाबी वादळाचे नाव ओखी प्रश्न झेलत उत्तरांसव गरजणाऱ्या धबधबाबी वादळाचे नाव ओखी चिंब साकीला कराया धडकते जे त्या शराबी वादळाचे नाव ओखी घुसळुनी मृदगंध हृदयी झिंगणाऱ्या मम् शबाबी वादळाचे नाव ओखी सागरी लाटांपुढे जे ना झुके रे त्या रुबाबी वादळाचे नाव ओखी गझल अक्षरगण वृत्त गालगागा/४ वेळा
-
रोज लिहावे (तीन मुक्तके) – ROJ LIHAVE (“SHOULD WRITE DAILY”)
-
गोमंतक – GOMANTAK (“LAND OF COW HERDERS”)
गोमंतक भू वरचा सुंदर स्वर्ग जणू आहे गोमंतक सृष्टीदेवीचा वर्ण जणू आहे काव्य झराया सदैव अनुकूल निसर्ग गोव्याचा गोमंतक काव्याचा आशय गर्भ जणू आहे अक्षरपंखी पुष्पपऱ्यांच्या सुगंध यात्रेची गोमंतक निर्मिती जादुई अर्थ जणू आहे अतिथी देवासमान मानुन तृप्त त्यांस करणे गोमंतक देशाचा हा तर धर्म जणू आहे सोनेरी भूमीत दिव्य या वनमंदिर शोभें गोमंतक आगम…
-
दिव्यध्वनी – DIVYADHVANI (“DIVINE SPEECH”)
हातामध्ये हात गुंफुनी सुखदुःखे झेलू भरतीच्या लाटांत न्हाऊनी चिंब चिंब होऊ प्रेमरतन धन प्रेमधर्म हा अंतरात जपुनी उधाणलेल्या प्रीत सागरा भाव अर्घ्य वाहू भरती वा ओहोटी असुदे जलामधे उतरू भवसागर हा पार कराया नावाडी होऊ लेखणीने वल्हवीत नेऊ पैलतटावर नाव वसवू तेथे जीव-अजिवाचे छान आगळे गांव विविध लिपीतुन एक लिपी शोधून अशी काढू दिव्यध्वनीतिल अक्षर…