Tag: MARATHI POETRY

  • ममता – MAMTA (love of mother)

    जपात रमले ध्यानी रमले तप केले मी शब्द जाळुनी राख जाहली मम् कर्मांची भाव भावना काव्य जाळुनी हृदय जाहले शांत जलासम बिंब प्रकटले सुंदर माझे आत्मस्वरूपी मग्न जाहले छळणारा मी भूत जाळुनी गाळ साठला तळी जलाच्या ओंजळ भरते शुद्ध जलाने नकाच फेकू दगड चुलीचे तुष्णा मिटली काष्ठ जाळुनी जात पात इतुकी ना मोठी त्याहुन मोठे…

  • नियम – (rule)

    मी न घालते नियम दुजावर बंधन घाले मी माझ्यावर माझा संयम प्रिय प्रिय मजला माझ्या सौंदर्यावर भुलला अस्त्र लेखणी भेदुन लक्ष्या जाळ्यामध्ये पकडे भक्ष्या शस्त्र लेखणी फिरे मनावर काळी शाई झरते झरझर जलद सावळा बरस बरसतो भाव भावना झिमझिम झरतो अक्षर अक्षर उजळत जाते त्यात लख्ख ब्रह्मांड झळकते

  • चुंबक – CHUMBAK (magnet)

    जादुई शब्दात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जादुई काव्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जे हवे ते मिळविण्या मी कोष विणते भावनांचा जादुई कोषात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे नेणिवेतिल स्वप्न अंबर ओतते राशी धनाच्या जादुई स्वप्नात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे देह माझा एक चुंबक खेचुनी घेई सुखांना जादुई आत्म्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे मी “सुनेत्रा” जाणतेकी ही…

  • स्वरदा – SWARADA (one who is associated with a nice vocal melody)

    सत्य प्रिय मी मला प्रिय मी सत्य प्रिय मी झुला प्रिय मी कृष्ण घन लेखणीत झरे सत्य प्रिय मी कला प्रिय मी शब्द शर लक्ष्यभेद करी सत्य प्रिय मी बला प्रिय मी न्याय आंधळ्या कर बरवा सत्य प्रिय मी तुला प्रिय मी सांग ऐकण्या तिज गझला सत्य प्रिय मी जिला प्रिय मी गुज मज बोलले…

  • अक्षरपुष्पे – AKSHAR-PUSHPE (flowers of letters)

    क्षमाच केली मी मजलाही मार्दवात मम् भिजे इलाही घाट चढाया मोक्ष-मुक्तिचा आर्जव माझे झाले राही निर्मल आत्मा दवात न्हाता शौच अंतरी दिशात दाही भादव्यातले ऊन तप्त हे कैसे माझे तन मन साही बोल बोल प्रिय माझ्यासंगे प्रिय वचने तू सुंदर काही सरस्वती शारदा सुंदरी अक्षरपुष्पे तुजला वाही दर्पणात अन नयन जळी तव जिनबिंबा मी सदैव…

  • उत्तम मार्दव – UTTAM MAARDAV (supreme humility)

    कोमल जल खडकांस कापते तैसे मार्दव सृष्टी जपते… फुलाप्रमाणे मृदू बनावे गुणानुरागी सुरभित व्हावे….. हृदयपाकळ्या उमलुन येता झुळकीवर हलके लहरावे,…. चंद्रकिरण प्राशून कुमुदिनी जैसी फुलते … मुनीमनातील वचने स्मरुनी आपण गावे….  

  • ध्यानअग्नी – DHYAAN AGANEE (flame of meditation)

    नेणिवेतिल सुप्त इच्छा जाणुनी ये जे तुला मिळवायचे ते पाहुनी ये अंतरातिल गूढ निर्झर नित्य वाहे भावघन सामर्थ्य मिळण्या प्राशुनी ये घे प्रवाहाच्या दिशेने लहर आतिल आतल्या हाकेस सुमधुर ऐकुनी ये मी कधीही रुग्ण नव्हते सजग होते हे लढाऊ आर्जवाशी बोलुनी ये मी क्षमाशिल संयमाने क्रोध त्यागे मार्दवाशी मैत्र होण्या तापुनी ये देहकाष्ठा वाळलेल्या शिस्त…