Tag: MARATHI POETRY

  • नाद अनाहत – uncreated sound

    क्षमा धारणे मार्दव येते हृदय भिजविते मन वचने कृति यात सरलता शौच प्रकटते आत्ममंदिरी नाद अनाहत मधुर बरसण्या अंतर्यामी शिवरुप सुंदर सत्य झळकते धूप सुगंधी मम् कायेचा संयम धर्मी तपोधुनीने यज्ञी जाळुन काम त्यागते भाव आप पर संसाराची करता वृद्धी त्यास त्यागुनी अकिंचन्य मी खरे जाणते उरता सात्त्विक प्रेम न उरता देहासक्त्ती ब्रह्मचर्य त्या निर्मल…

  • खाई – chasm

    ही तर सुंदर सुडौल मोहक तरुण मनाची बाई आहे आई आहे पूर्ण नार ही विजेप्रमाणे कडाडणारी घाई आहे आई आहे सुजला सुफला मम् गझलेच्या जमिनीमध्ये अक्षरबीजे पेरायाला लेखणीतुनी टपटपणारी ही झरणारी शाई आहे आई आहे शुभ्र सरोवर राजहंस अन लहरींवरती टपोर कमळे अशी मनोरम गर्द गारवा पांघरलेली ही आंब्याची राई आहे आई आहे मस्त काफ़िये…

  • गजरा – torse

    गडद निळे गडद गडद आभाळ सावळे झाले काळ्या काळ्या जलदांनी नभ भरुनी आले मौक्तिक माळा घालुन सजल्या श्याम मेघना शीळ घालतो मारुत मंजुळ खग घेती फांदीवर ताना झरझर झरझर झरती धारा टपटप टपटप पानांवरती मुदगंधाचा सुगंध प्राशुन शब्द उधळले पानांवरती गोळा करुनी शब्द अंजलीत टपोर गजरा कुणी बनविला माय आठवे सुंदर माझी तिनेच गजरा असा…

  • ममता – love of mother

    जपात रमले ध्यानी रमले तप केले मी शब्द जाळुनी राख जाहली मम् कर्मांची भाव भावना काव्य जाळुनी हृदय जाहले शांत जलासम बिंब प्रकटले सुंदर माझे आत्मस्वरूपी मग्न जाहले छळणारे मी भूत जाळुनी गाळ साठला तळी जलाच्या ओंजळ भरते शुद्ध जलाने नकाच फेकू दगड चुलीचे तुष्णा मिटली काष्ठ जाळुनी जात पात इतुकी ना मोठी त्याहुन मोठे…

  • नियम – rule

    मी न घालते नियम दुजावर बंधन घाले मी माझ्यावर माझा संयम प्रिय प्रिय मजला माझ्या सौंदर्यावर भुलला अस्त्र लेखणी भेदुन लक्ष्या जाळ्यामध्ये पकडे भक्ष्या शस्त्र लेखणी फिरे मनावर काळी शाई झरते झरझर जलद सावळा बरस बरसतो भाव भावना झिमझिम झरतो अक्षर अक्षर उजळत जाते त्यात लख्ख ब्रह्मांड झळकते

  • चुंबक – magnet

    जादुई शब्दात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जादुई काव्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जे हवे ते मिळविण्या मी कोष विणते भावनांचा जादुई कोषात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे नेणिवेतिल स्वप्न अंबर ओतते राशी धनाच्या जादुई स्वप्नात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे देह माझा एक चुंबक खेचुनी घेई सुखांना जादुई आत्म्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे मी “सुनेत्रा” जाणतेकी ही…

  • स्वरदा – one who is associated with a nice vocal melody

    सत्य प्रिय मी मला प्रिय मी सत्य प्रिय मी झुला प्रिय मी कृष्ण घन लेखणीत झरे सत्य प्रिय मी कला प्रिय मी शब्द शर लक्ष्यभेद करी सत्य प्रिय मी बला प्रिय मी न्याय आंधळ्या कर बरवा सत्य प्रिय मी तुला प्रिय मी सांग ऐकण्या तिज गझला सत्य प्रिय मी जिला प्रिय मी गुज मज बोलले…