-
आज वाटते- AAJ VAATATE (today I want, I feel)
आज वाटते पाऊस यावा माझ्याहुनही चिंब भिजावा थेंब टपोरे मौक्तिक झरझर केसांतुन यावे गालावर जुनी पुराणी छत्री तरीही पुन्हा धरूया तिज डोईवर तशात येता सुसाट वारा वेचाव्या छत्रीतच धारा हातगाडीशी थांबुन क्षणभर कणसे खावी चोळुन मिरपुड रस्त्यावरती पाणीच पाणी गाऊ रचुया पाऊस गाणी येईल पाऊस येईल पाऊस रडविण्यास त्या वेड्या भाऊस
-
सुजला सुफला – SUJALA SUFALA (Having plenty of pure water and abundant rich fruits)
माय मराठी प्राणाहुन प्रिय मरहट्टे जन गर्जा जय जय कुंडलिका अन नीरा पवना मुळा मुठा वारणा कोयना महाराष्ट्र मम सुजला सुफला शिवबा शंभू जेथे लढला कभिन्न कातळ फोडित पत्थर स्वच्छ जले झुळझुळती निर्झर ज्ञानदेव नामा तुकयाची अभंग गाथा ओवी साची पुणे मुंबई मावळ डगरी खऱ्या शोभती उद्यम नगरी वाऱ्या वाऱ्या घुमव बासरी ओत काव्यजल भरुन…
-
पथ हा निर्जन – PATH HAA NIRJAN (This deserted path)
पथ हा निर्जन स्वच्छ मोकळा पिवळ्या पुष्पांनी सजलेला पुढे दुतर्फा वृक्ष देखणे पर्ण रहित घन गर्द फुलोरा दूर दूर पथ कोठे जाई भेटायाला कुठल्या गावा स्वच्छ बाकडी सुनी सुनी ही कुणी न त्यावर बसावयाला धरणीवरती श्याम सावळ्या आकाशाची निळसर छाया पीत फुलांचा सडा भूवरी झुळूक स्पर्शते हरित तृणाला कोणासाठी कुणी बनविला सुंदर झुळझुळता हा रस्ता
-
मिसळ मिसळ – MISAL MISAL(to mix)
मिसळ मिसळ तू मिसळ भावना पुदगल शब्दांमधे भरत भरत तू अर्थ नेमके अनवट शब्दांमधे घुसळ घुसळ तू साय दह्यातिल लोणी काढायास तूप कढवुनी ओत त्यास तू कडवट शब्दांमधे फुलव फुलव तू फुलव मनाला येण्या खुदकन हसू हनुवटीवरची खळी रुतुदे अडमुठ शब्दांमधे उडव उडव तू घरभर चेंडू मनात टप्पे मोज मनातले तेवढेच टप्पे उतरव शब्दांमधे भरव…
-
बिंब – BIMB (image)
जेव्हा प्रिय मम डोईत घुसते नशा तयाची चढते चढते पुरती मी मग वेडी बनते अप्रियांचे वेड काढते अन प्रियांना वेड लावते… डोईमधल्या अनंत खोल्या गडद जांभळ्या पडदेवाल्या खोल्यांमध्ये प्रिय मग शिरते सामानाला विखरुन देते बंद कपाटे उघडुन सारी सामानाला विखरुन देते विस्मृतीतल्या घड्या चाळते दुःखालाही चिडवित बसते चिडवुन चिडवुन रडव रडवते रडताना मग खो खो…
-
मैत्रीण लाडाची – (a dear female friend)
-
अनोळखी – ANOLAKHEE (unknown)