-
झरतृष्ट – ZARATRUSHTA (GOLDEN SHINING STAR)
-
हितकर – HITAKAR (SALUBRIOUS)
-
उखळ – UKHAL (MORTAR)
रदीफ काफियासवे गझल मस्त शोभते तंग जरी काफिया ग वसन चुस्त शोभते सारवान आज नको तूच उंट हाक रे पुनवेची चांदरात ग्रहण गस्त शोभते भेटण्या मला बरी पुलावरील झोपडी महागड्या घराहुनी स्वच्छ स्वस्त शोभते गण मात्रा लगावली तराजूत तोलण्या लष्करची तुला गडे शान शिस्त शोभते हत्तीवर पागोळ्या बसुन बरस बरसती भरला घट उखळ मुसळधार हस्त…
-
सातबाराचा उतारा – SAAT BARACHA UTARA (THE 7/12 EXTRACT)
पाच बारालाच लिहिला सातबाराचा उतारा माझिया हाती धरेचा सातबाराचा उतारा मी जरी शाईत काळ्या बुडवुनी टाकास लिहिते सप्तरंगी रंगला हा सातबाराचा उतारा काल होते चार बारा आज आहे पाच बारा बघ सहा बारा उद्याला सातबाराचा उतारा पुण्य मातीचे फळोनी मोतियासम अक्षरांचा मज मिळाला हा चिठोरा सातबाराचा उतारा टोलवीले कैक वेळा आज पण ते शक्य नाही…
-
शाल – SHAWL
-
ओखी -OKHEE
ज्या गुलाबी वादळाचे नाव ओखी त्या नबाबी वादळाचे नाव ओखी प्रश्न झेलत उत्तरांसव गरजणाऱ्या धबधबाबी वादळाचे नाव ओखी चिंब साकीला कराया धडकते जे त्या शराबी वादळाचे नाव ओखी घुसळुनी मृदगंध हृदयी झिंगणाऱ्या मम् शबाबी वादळाचे नाव ओखी सागरी लाटांपुढे जे ना झुके रे त्या रुबाबी वादळाचे नाव ओखी गझल अक्षरगण वृत्त गालगागा/४ वेळा
-
रोज लिहावे (तीन मुक्तके) – ROJ LIHAVE (“SHOULD WRITE DAILY”)