Tag: Marathi sahitya

  • पवन – PAVAN

    पात्र निर्झरी झुकून लागले भरायला लाल लाल लाल लाल लाल लाल लालला पर्ण पाकळ्या सचैल चिंब वल्लरी झरे तापल्या झळांत गात मुकुल बहर टिकवला कोणती लगावलीय वृत्त नाम कोणते मी न शोध घेत बीत काव्य धर्म भावला अंतरातल्या जळी समुद्र गुप्त जाहला शीळ घालतो न पवन कुंदनात मढवला कर्म धर्म ज्ञान ध्यान गुरुकुलात साधना सावलीत…

  • जुगाड – JUGAAD

    यंत्रे जुगाड नकली नाती लबाड नकली मी सावरू कशाला नाती लबाड नकली पुण्यामुळेच विकली यंत्रे जुगाड नकली रद्दीत घातले मी शब्दांस द्वाड नकली जल ना फळी दव्याला तरु ताड माड नकली लष्कर फुका न आले पोलीस धाड नकली शोधू नको सुनेत्रा ते गझल बाड नकली

  • जादुई रत्नत्रय – JADUI RATNATRAY

    आपण जेंव्हा जन्मतो तेंव्हा आपल्या आत एका परिपूर्ण सर्वांगसुंदर आत्म्याची प्रतिमा असते. त्या प्रतिमेनुसारच आपण घडत वाढत जातो. हि प्रतिमाच आपली सच्ची जन्मकुंडली असते. आपली कुंडली आपण स्वतःच मांडू शकतो. जाणू शकतो. आपल्याला हवी तशी बदलूही शकतो. त्यासाठी इच्छाशक्ती बुलंद असावी लागते.हाच तर आपला प्राण असतो. दुसरा कोणीही आपली सच्ची जन्मकुंडली जाणू शकत नाही. लिहू…

  • वाकड – VAAKAD

    विटी कोलली वाकड झाली झोप उडाली झापड झाली लाट लाटली इतुकी पातळ तळून पोळी पापड झाली बारा वाजुन गेल्यावरती कशी आरती काकड झाली कणकेमधुनी मोहन गायब शिळी चपाती वातड झाली खच्चुन भरला मिथ्य मसाला कथा मूळची भाकड झाली जगी मिरविण्या घेतलीस जी जबाबदारी कावड झाली जिन धर्माची ध्वजा पेलण्या आज सुनेत्रा धाकड झाली

  • तिडी – TIDEE

    पावलात दो तिडी असूदे वा दुर्वांची जुडी असूदे हळद उतरण्या अंध रुढींची दोन नयांची शिडी असूदे मुक्तक झाले पूर्ण तरी पण तिसऱ्या शेरी उडी असूदे शरी कुडीतच जीव जरी रे ऊर्ध्व गतीची छडी असूदे रत्नत्रय अंतरी सुनेत्रा सिद्ध गझल पोतडी असूदे

  • तुंबळ- TUMBAL

    मंगल मंगळ मंगळवार मंदिर आगम कंदिल वार चंचल उपवन जंगल रान मंथर अंगण अंचल वार कुंदन कंकण किणकिण नाद मंद पवन घन मंजुळ वार झुंबर अंबर लखलख वीज मंचक झुलता कुंडल वार पावन बेला गोरज सांज मंत्र णमो जिन मंगल वार वृत्ती वृत्तातील प्रकार मंदाक्रांता तुंबळ वार शुक्र उगवला वारी आज मंडप मांडव मंडळ वार

  • काय – KAAY

    काय लिहू मी काय लिहू काय कोण का प्रश्न लिहू प्रश्न नको तर उत्तर घे काय पुढे दो टिम्ब लिहू विरामचिन्हे टपटपती काय देह तनु चिंब लिहू खरा देव मम आत्मगुरुच काय कशाला मीच लिहू शेर खरे की वाघ बरे काय सुनेत्रा नाव लिहू