Tag: Marathi sahitya

  • बाकी तरिही – BAKI TARIHEE

    अर्ध्या हळकुंडाने ते का पिवळे झाले होतेबाकी काही नसले तरिही भरून आले होते भरून अंतर गदगद होता प्याल्यावर प्यालेथरथरत्या बोटांनी गझलाअजून प्याले होते जमिनीवरच्या सरपटणाऱ्या रांगा टाळायालाहवा खेळवुन फुफ्फुस भरता उंच उडाले होते टिम्ब टिम्बच्या रांगोळीवर मुक्त हस्त मम फिरताबरसायाला जलद त्यावरी जलद निघाले होते पुन्हा नवा मी मक्ता गुंफुन नाव सुनेत्रा लिहिताओळीवरती त्याच जुन्या…

  • भक्ती – BHAKTI

    मधुरा भक्ती चंद्र चांदणे आत्म प्रीत गातेध्यान करावे कर्म निर्जरा करत रीत गाते सहस्त्र रश्मी अरुण वरुण शुभ स्तुति गात येईविजय पताका नूतन संवत लहर शीत गाते प्रकाश माळा विविध रंगी प्रभा धरा सृष्टीनिशांत होता निर्झर बाला गझल गीत गाते आज पाडवा चला मंदिरी प्रभू गुण गाण्यासअक्षर अक्षर झळकत आहे शुभ्र फीत गाते शांत उपवनी…

  • मजबूत – MAJBUT

    कशास रे होडी हवी हात पाय मजबूतमोठे विक्राळ सागर केले पोहून मी पार माझ्या हृदयी कंदील ज्योत त्याची तेवणारीत्याच्या प्रकाशात पीत निळा समुद्र पेलला सारेगमपधनीसा सूर लागले गगनीलाल पेटले अंबर घन काळे गोठवूनी कुठे कुणी कसे कोण काय प्रश्न कुंडलीचेअश्या कुंडलीचे प्रश्न चुलीलाच भरवले माझ्या माजी कुंडल्यांची राख खाक झाली आजराखेचे त्या उटणे मी आज…

  • माधुर्य – MADHURYA

    माधुर्य चंद्रम्याचे किरणांत पारिजातअरिहंत देव प्रतिमा पुष्पात पारिजात फुलला सुवर्ण चाफा झेंडू गुलाब बूचमृदगंध बकुळ प्राशे परसात पारिजात मम माय धार काढे चरवीत दुग्ध धारघन रास माणकांची लक्षात पारिजात पाऊसधार गाते गातोय कल्पवृक्षमोती नि पोवळ्यांचा हस्तात पारिजात जास्वंद कुंडलांची डुलतेय माळ सिद्धताठ्यात गुलछडीसम बहरात पारिजात

  • मासा – MASA

    झाला मनमोर मम घन चैतन्य विभोरवर्षण्यास चांदण्यात नभ आतुर आतूर माझे रंगरूप बाई बाई मला वेड लावीमासा तळ्यातील हाती अलगद आला बाई नीर तळ्यातील शांत प्रतिबिंब स्थीर त्यातयोग्यासम ध्यानस्थ तो काठावरी उभा निंब अंगणात कवडसे उतरले नाचावयापाठशिवणीचा खेळ खेळताती पर्णछाया पहाटेस शीत वारा सडा फुलांचा शिंपेलचाफा बूच पारिजात चिंब दवात न्हाईल

  • चिमा – CHIMA

    जुन्या नव्या गोष्टीतील पात्रे …जिवंत होऊन जणू बोलती …गाव पुस्तकामधील सुंदरजुनीच चित्रे रंगवणारे…..निळसर अंबर धम्मक कविता…पिवळ्या हळदी अजून झुलती… दिवस सुगीचे ओला चारा..गोठ्यामधली नंदा कपिला..ऊन कोवळे पिवळे तांबूस ..शेत साळीचे श्रावण झूला ….. अहमद लीला..यास्मिन सीता …कृष्णाचा गोपाळ राखतो…अजून गाई पाण्यावरच्या … मन्नो दीदी गावी येते.. जीप घेऊनी ..किती भावतो लाल मलमली..तिचा दुपट्टा तरंगणारा… अंकलिपी…

  • रेनकोट – RAINCOAT

    रेनकोट या दिवाळीत मी असा निराळा घेईन रे …काठ जरीचे नसतील त्याला काठी घुंगुर माळा रे….. धुंवाधार पाऊस पडताना घालून तो मी मिरवेन ..छुमछुम त्याची ऐकत ऐकत पाऊस गाणी रचेन ग … थेंब टपोरे टपटप झरतील घुंगरातुनी झरझर रेत्या नीरातून भूमीवर मग अंकुर रुजतील हिरवे रे … रंगबिरंगी दीप उजळता काव्यातून मम अंतर रे ..उजळून…