Tag: Marathi sahitya

  • सोड – SOD

    पडलं ! कुठलं ! घोडं .. बाई घोडं ! पडलं ! सुटलं ! कोडं .. बाई घोडं ! बघुन हिरवं रान, गाया गाणं ! पडलं ! बसलं ! थोडं ..बाई घोडं ! धरलं म्हणुन, आलं हाती सोनं ! पडलं ! पुजुन ! जोडं.. बाई घोडं ! “धन उधळत”, बोल म्हणता वात ! पडलं ! हसलं…

  • जैन पारा – JAIN PAARAA

    मुक्तक – पाट्याचा पारा वाट्याला आले, तेच वाटते बाई.. वाटाया मिरच्या, वरवंट्याची घाई.. कंकणे वाजता, किणकिण ठाई ठाई.. पाट्याचा पारा उतरत उतरत जाई.. रुबाई – जैन संस्कृती आत्महितास्तव परहित करुनी गगन चुंबते जैन संस्कृती हृदयामधली प्राकृत बोली अधरी जपते जैन संस्कृती घन मालांतुन उदक वर्षते चिंब भिजविण्या सुकल्या गात्रा उगाळेन चंदन प्रीतीचे सहज जुळाव्या अक्षर…

  • जा ! जा ! जारे ! वारे ! – JAA ! JAA! JAARE ! VAARE !

    वादळ वारे ! वारे ! म्हणते गा! रे ! वारे ! शीळ वारियाची ही ! स्वर हे सा !रे ! वारे ! म्हणते फुलवत ज्योती ! अरेस का रे ! वारे ! सागर तीरी वेगे ! सुटले खारे ! वारे ! वाह ! वाह ! वा ! वा वा ! लखलख तारे ! वारे !…

  • रतिब – RATIB

    टोक गाठणे आवडते मज तिथुन पाहणे आवडते मज टोकावरती आसन ठोकुन स्वतःत रमणे आवडते मज कातळातला झरा प्रकटण्या त्यास फोडणे आवडते मज खडे कुणीपण कैक टाकुदे खडे काढणे आवडते मज पायवाट शोधून स्वतःची तिला मळवणे आवडते मज ताज्या ताज्या लिहून गझला रतिब घालणे आवडते मज श्रुतपंचमीस विनम्र भावे शास्त्र वाचणे आवडते मज

  • महान ईश – MAHAAN EESH

    शांत चित्त शुद्ध देह माय तृप्त चिंतनात सांग याहुनी महान ईश कोणता जगात मेंढरे जरी बरी खरी हुशार माकडेच जांभळ्या फळांस गोड ठेवतात काळजात एक शेर जादुगार मम सुनेत्र त्यात दोन जांभुळासमान गडद काळजास छेडतात अर्घ्यरूप आसवात चिंब जाहलेय बिंब पाहतेय ऐकतेय उमटतेय मौन रात अंतरात लावलीस जी अजून तेवतेय ना हलेल अन विझेल वादळात…

  • पेढे – PEDHE

    निळे जांभळे थेम्ब बोचरे तुझे टपोरे आले काळ्या कोऱ्या पाटीवरती अक्षरांत मी न्हाले गडद काळिमा शांत होऊदे प्राशुन हिरवे पाणी मुळाफुलांनी गावी आता निळसर पहाटगाणी घूम पावशा पानांआडून येण्या पाऊसधारा उन्हास हळदी तना लपेटून शीळ घालण्या वारा लिहीन गाणी सहज सहज मी नाव सुनेत्रा माझे कळ्याफुलांचे गेंद तरुंवर दलात सौरभ ताजे सुगंध लुटण्या येतील भुंगे…

  • रचना – RACHANA

    नभांगणी लखलखली रचना कडाडणारी बिजली रचना जलदांच्या मालांचे नर्तन मौक्तिकमय थरथरली रचना चिद्घनचपला वीज सुंदरी निसर्गातली असली रचना प्रतोद काळा फिरता सळसळ ठिणगीतुन अवतरली रचना झळाळून उठता मम गझला दिव्य सुनेत्रा स्फुरली रचना