Tag: Marathi sahitya

  • शंख – SHANKH (CONCH SHELL)

    उठव स्वतःच्या सौन्दर्यावर ठसा स्वतःचा उधळ स्वतःच्या सुंदरतेवर पसा स्वतःचा कशास तुजला कुणी म्हणावे स्वतःस ओळख स्वतःस कळता पूर्ण कहाणी वसा स्वतःचा कोमल काया तरल मनाची अवघी माया कटीवर सांडे कनक गुणांचा कसा स्वतःचा ऐन्यामध्ये रंगरूप बघण्याच्या आधी नित्य करावा साफसूफ आरसा स्वतःचा कंठ गळा जणु शंख सुनेत्रा फूंक तयाला श्वासातून मोकळा कराया घसा स्वतःचा

  • घण – GHAN (SLEDGE)

    चला तुतारी फुंकू आपण सत्त्वर त्यागू मीपण बीपण मिथ्यात्वावर घालूया घण काव्य तुतारी फुंकू आपण ओठांनी अपुल्या अंतरीचा आवाज उमटूदे काव्यातून अपुल्या मशाल पलिते धरू पेटते दीपस्तंभ ते काव्यपथाचे अखंड चळवळ हात राबते ओंजळ ओंजळ प्रेम सांडुदे हातातून अपुल्या अंतरीचा आवाज उमटूदे काव्यातून अपुल्या जीव जपावा वत्सल भावे नकोच ईर्षा हेवेदावे स्वाध्यायाने गुण उजळावे दहशत…

  • उपचार – UPCHAR (TREATMENT)

    कीड नडली पुन्हा बहर नडले कुठे पूर्ण उमलूनही पुष्प खुडले कुठे लाल अंगांग झाले रगडले कुठे चोर रंगेल हाती पकडले कुठे हा उन्हाळा नव्हे पावसाळा नव्हे नीर सांडे तरी भाव रडले कुठे मत्स्य भरतीतले रास जाळ्यामधे तप्त वाळूत मीन तडफडले कुठे कर्म प्राचीन जर धर्म संयम हवा कैक उपचार पण रोग झडले कुठे वीज नाचूनही…

  • राजधानी – RAJDHANI (CAPTIAL)

    पंकात वासनेच्या रुतले कधीच नाही कमळातले अली पण डसले कधीच नाही चढवून चिलखताला चिखलात खोल गेले तेथे निवास करणे रुचले कधीच नाही रंगून राजधानी सुकुमार भावनांची व्यापार त्यात करुनी फसले कधीच नाही घोटून अक्षरांना केली अशी करामत ठिणग्या करात फुलल्या विझले कधीच नाही तपवून पाप गेले देऊन पुण्य आले भिजले कृतज्ञ भावे रुसले कधीच नाही…

  • चुळबूळ – CHULBOOL (RESTLESSNESS)

    अमूल मूळ कुठले कूळ नवीन नाव भंजन खूळ खा पोळीस मोडुन सूळ बसले शांत चारुन धूळ जल पान करु भरून चूळ वय जाहले का चुळबूळ मी सुनेत्रा मोडे शूळ  

  • सुकण्ण – SUKANN (BEAUTIFUL EYES)

    कंठ शंख आवाज पुणेरी नखऱ्याचा नव बाज पुणेरी झणक फणक मिरचीचा ठसका ऐक समुद्री गाज पुणेरी ढोल नगारे लखलाभ तुला वाजविते पखवाज पुणेरी गालांवर रक्तिमा स्वरांकित नयनांनमधली लाज पुणेरी सुकण्ण सळसळते दो बाहू सुनेत्रास सरताज पुणेरी

  • अक्षर मोती – AKSHAR MOTI (PEARLS OF LETTERS)

    अक्षर मोती शिम्पल्यातले अक्षर पत्री टपटप झरले जीवांमधले भाव रुजाया पत्रावरती जलद बरसले कितीक पत्रे किती छप्परे दारे भिंती फळे जाहले वनी अंगणी कैक काफिये रदीफ इंजिन त्यास जोडले अलामतीला जपेन म्हणता चिद्घन चपलेचे कर जुळले