-
चिंधी संधी – CHINDHEE SANDHEE
चिंधी संधी….. (दोन मुक्तके) मला हवी तर मिळेल मजला संधी बिंधी कशास बांधू जखमेवरती चिंधी बिंधी रक्त सांडुदे म्हणून करते कानाडोळा तुला वाटते तशी न मी रे अंधी बिंधी … इच्छा आहे जगावयाची म्हणून मी या जगती आहे मरेन केव्हातरी पुढे मी तुजसाठी पण संधी आहे मरावयाची असली चिंधी संधी मजला नकोच आहे इच्छेविन मज मारायाची…
-
ठाणे – THAANE
पुण्यनगरी प्रिय जिवांची मिथ्य शक्तीचे न ठाणे आवडे आत्म्यात मजला बिंब माझे मी पहाणे उमलती काव्यात माझ्या अंतरीची भावपुष्पे तोंडच्या वाफेवरी ना धावते मम मुक्त गाणे बोलते बेधडक तरीही दुखविले ना व्यर्थ कोणा बोलण्याचे टाळण्याचे धुंडते ना मी बहाणे बाष्प पापातिल जलाचे दाटते मेघात जेव्हा लोळुनी झिंगून पिंगुन बरळतो वारा तराणे टिपुन घेती चिवचिवाटा नेत्र…
-
तीर्थंकरा – TEERTHANKARAA
पंचकल्याणिक कुणाचे बोल रे तीर्थंकरा इंद्रियांचे की जिवाचे सांग रे तीर्थंकरा गणधरांनी संप केला बैसले ध्यानात ते समवशरणच ओस पडले ऊठ रे तीर्थंकरा शस्त्रधारी भक्त येता मौन शासनदेवता मौन त्यांचे सुटत नाही वाच रे तीर्थंकरा ठासलेल्या लेखण्या या मायभूच्या रक्षणा तूच आता चाप त्यांचा ओढ रे तीर्थंकरा पंचभूते भडकलेली उदक नाही औषधा अर्घ्य तुज देण्यास…
-
भट्टी – BHATTEE
समय आहे शांत आहे मुग्ध अंतर गात आहे वारियातील मोगऱ्याच्या परिमलाने न्हात आहे कुंदनाचे पात्र ग्रीष्मा वितळता भट्टीत तुझिया मृत्तिकेचा गंध त्यातिल माझिया देहात आहे मी कशी परजेन शस्त्रे मारण्या जीवास कुठल्या जीव जगण्या लेखणीची परजते मी पात आहे लाट येता पाणियातिल बिंब हलते फक्त माझे तू नको पण डळमळू रे मी कुठे पाण्यात आहे…
-
मंत्र – MANTRA
अक्षर बीजांमधुनी उमटता मंत्र हृदय मंदिरी हवे कशाला कर्मकांड अन तंत्र हृदय मंदिरी जरी मोजुनी मात्रा लगक्रम यंत्री भरला तरी विशुद्ध भावांविन ना चाले यंत्र हृदय मंदिरी
-
खरा अर्थ – KHARAA ARTH
खरा अर्थ ना चा मला सांग तू रे जसे होय हो ना तशी भांग तू रे लगा गाल गागाल गा गाल गा गा अशी चाल लावून दे बांग तू रे मना वाटते ते इथे मांडले मी जरी ना दिलेला कुणा थांग तू रे लिहाया पुसाया पुसूनी स्मराया कसे नित्य बघतोस पंचांग तू रे पहा पाच…
-
हंबर – HAMBAR
तुझ्या नि माझ्या दुःखामध्ये अंतर आहे पाण्याविन ही जमीन माझी बंजर आहे अंतरातल्या मम दुःखाला रंगरूप ना रंगरुपाहुन स्वभाव त्याचा सुंदर आहे दुःखाला मी करुन दिगंबर निर्भय झाले माझ्यासाठी हाच सुखाचा मंतर आहे कैक आयड्या करून वेड्या गझला लिहिल्या त्या गझलांचे गोठ्यामध्ये झुंबर आहे गोठ्यामधल्या जित्राबांचे शेण काढुनी सारवलेल्या जमिनीवरती लंगर आहे शेणकुटे मी रोज…