Tag: Marathi sahitya

  • सुतक – SUTAK

    पाळते ना सुतक ताई बोलते बेधडक ताई ढोंग जेथे त्या तिथूनी निघुन येते तडक ताई सत्य शोधाया कळाया यत्न करते अथक ताई घाम गाळुन चिंब भिजवे तापलेली सडक ताई काल जी होती मुलायम आज झाली कडक ताई

  • जवस – JAVAS

    पुनव ना मी अवस आहे ना कुणाची हवस आहे चढविशी का पाक मजवर तीळ ना मी जवस आहे

  • भूमीताय – BHUMEE TAAY

    भूमीताय दिस उजाडल्यापासून तापू लागते. ढग पांढरे तपास बसलेत.एप्रिल आला. चैत्र येतोय. कोसळारे ढगांनो…. कुणाची ताय आहे ती कुणाची आय आहे ती घाल या माहात न्हाऊ तापली बाय आहे ती ….

  • स्वभाव – SWABHAAV

    फुलाप्रमाणे कोमल सुरभित वज्रासम खंबीर स्वभाव मुक्तिपथावरच्या आत्म्यांचा शूर वीर अन धीर स्वभाव धर्म अहिंसा शाश्वत जगती बिंबविण्या आचरणातून मन वचने कायेतुन झळके शुद्ध अहिंसक मीर स्वभाव पुण्याईने मनासारखे घडते जेव्हा सारे छान जणु काचेच्या पात्रामधले मधुर सुवासिक क्षीर स्वभाव यौवन धन सत्तेची मदिरा चढते जेव्हा मस्तिष्कात उतरविण्या ती मादक धुंदी होतो वेडा पीर स्वभाव…

  • गोडवे – GODAVE

    प्रभात होता उघडुन फाटक कामाला जावे.. असेल जरका सुट्टी तर मग निवांत झोपावे… झोप पुरी मी घेतो म्हणुनी इतुका मज संयम.. यास्तव आपण दशधर्माचे गोडवेच गावे…

  • गारुडी – GAARUDEE

    सूर ताल अन लय असताना लय असताना गाणे गावे भय नसताना लय असताना अधरीच्या वा लिहिल्या गाण्या यंत्र पकडते मंत्र भारली सय हसताना लय असताना चारित्र्याची ऐशी तैशी म्हणे गारुडी पुद्गल शब्दां मय डसताना लय असताना निश्चय काही करू न शकला बघत राहिला व्यवहाराचा नय फसताना लय असताना जय जय जय वा जैकाराचा घोष दुमदुमे…

  • कामे – KAAME

    इतुके लिहुनी नकोस टाकू टाकुन टाकुन दमशील ग इतुके गझले नकोस झाकू झाकुन झाकुन दमशील ग वाकून तू ग करिशी कामे दिवसरात्रभर किती किती इतुके बाई नकोस वाकू वाकुन वाकुन दमशील ग