Tag: Marathi sahitya

  • कौमुदी – KAUMUDEE

    सूर्यकिरण कोवळे चुंबिता उमले कमळ कळी कार्तिक स्नानासाठी उतरे बिंब रवीचे जळी झळाळणाऱ्या पीत दुपारी मिटुन केतकी दले जर्द पितांबर पांघरुनी बन सुवासिक झोपले पिवळी तांबुस सांज मखमली श्यामल श्यामल धरा टिपुर टिपुर टिपऱ्यांच्या संगे खळखळ गातो झरा गोधूळीने दिशा रंगल्या गवळण काढे धार गोप टाकतो गोठ्यामध्ये भारा हिरवागार लाल निखाऱ्यावरी चुलीच्या पात्र ठेवता माय…

  • मुरलीचे स्वर – MURALEECHE SWAR

    अहह ! अहह ! आषाढ घनांतुन कृष्ण नीळ तन मन जलदांतुन शकुन्तलेचे कुंतल श्यामल बरस बरसती झरझर भूवर कुरळ कुरळ कचभार प्रियेचा उडवत जाता झोत हवेचा कालिंदीच्या सलील जलावर हिंदकळे राधेची घागर पाझरणाऱ्या त्या सलिलावर मुरलीचे स्वर… मुरलीचे स्वर….

  • पुष्पावली – PUSHPAAVALEE

    झेंडू चंपक पद्म बूच बकुळी जाई जुई मोगरा शेवंती मधुमालती तगर कोरांटी चमेली जपा गागागा लल गाल गाल ललगा गागालगा गालगा चौदा पुष्प लगावलीत रचले शार्दूलविक्रीडिता वृत्त- शार्दूलविक्रीडित (मात्रा ३०)

  • पखरण – PAKHARAN

    जाति : श्यामाराणी झुळुक पहाटे लहरत आली प्राजक्ताच्या झाडाखाली शुभ्र फुलांची पखरण झाली धवल केशरी रांगोळीने भुई चिंबली रंगात पानांवरुनी ओघळल्यावर थेंब दवाचे टपटपल्यावर लोळुन घुसळुन त्यात स्वतःला भिजली माती गंधात मातीवरचे टिपण्या दाणे रंगबिरंगी पक्षी आले टिपता दाणे गाती गाणे जणू आकडे बसलेले ते अंकलिपीतिल अंकात एक पाखरू निळे त्यातले भुंग्यामागे उडू लागले दमून…

  • अंतरात आई – ANTARAAT AAEE

    जाति : परिलिना अजूनही तुझी छबी अंतरात आई.. (धृ.पद) दूर कुठे जाहलीस तुला पाहते मी सांजवात लावुन तुजसवे बोलते मी सुगंध धूप दरवळे शोक दूर दूर पळे स्वप्न तुझे पूर्ण फळे अंगणात पुष्पांनी वाकली ग जाई .. दादांची सखी प्रिया होतीस तू माय नातवंडे तुला जणु दुधावरील साय वदन तुझे सुस्वरूप हास्य तुझे चंद्ररूप नेत्र…

  • टॅटू – TATTOO

    बाई सुया घे गं दाभण घे …या जुन्या लोकगीताच्या चालीवर आधारित नवे गीत बाई सुया घे गं दाभण घे …. टॅटू गोंदवुन घ्या गं कुणी … टिकल्या घ्या कुणी ऐना फणी….(धृ. पद) कुरळ्या केसांच्या हौसाबाई डोकं धुवाया घ्या शिकेकाई दुखऱ्या फोडावर धोंडामाई लावा शेकुन बिब्बा बाई झाडाल वाडा मग बावन खणी … टिकल्या घ्या कुणी…

  • नीर झरा ग नीर झरा – NEER ZARAA G NEER ZARAA

    गगन चुंबण्या उभ्या खड्या तुझ्याच अधरांवरुन कड्या मस्त नाचतो घेत उड्या खळखळ वाजत भरे घड्या घालत भूवर पायघड्या नीर झरा ग नीर झरा… जळी तरूंचे सांगाडे बाजुस शिंदीची झाडे त्यावर मेघांचे वाडे वीज कडाडुन ते पाडे ढगातून कोणा धाडे नीर झऱ्यास नीर झऱ्यास … कधी करितसे शांत जला बिंब दावण्या गवतफुला उडवुन अंगावर पाणी तृणपात्यांना…