-
तीर्थंकरा – TEERTHANKARAA (SUPREME LORD)
पंचकल्याणिक कुणाचे बोल रे तीर्थंकरा इंद्रियांचे की जिवाचे सांग रे तीर्थंकरा गणधरांनी संप केला बैसले ध्यानात ते समवशरणच ओस पडले ऊठ रे तीर्थंकरा शस्त्रधारी भक्त येता मौन शासनदेवता मौन त्यांचे सुटत नाही वाच रे तीर्थंकरा ठासलेल्या लेखण्या या मायभूच्या रक्षणा तूच आता चाप त्यांचा ओढ रे तीर्थंकरा पंचभूते भडकलेली उदक नाही औषधा अर्घ्य तुज देण्यास…
-
भट्टी – BHATTEE (KILN)
समय आहे शांत आहे मुग्ध अंतर गात आहे वारियातील मोगऱ्याच्या परिमलाने न्हात आहे कुंदनाचे पात्र ग्रीष्मा वितळता भट्टीत तुझिया मृत्तिकेचा गंध त्यातिल माझिया देहात आहे मी कशी परजेन शस्त्रे मारण्या जीवास कुठल्या जीव जगण्या लेखणीची परजते मी पात आहे लाट येता पाणियातिल बिंब हलते फक्त माझे तू नको पण डळमळू रे मी कुठे पाण्यात आहे…
-
मंत्र – MANTRA (SPELL)
-
खरा अर्थ – KHARAA ARTH (TRUE MEANING)
-
हंबर – HAMBAR (MOOING)
तुझ्या नि माझ्या दुःखामध्ये अंतर आहे पाण्याविन ही जमीन माझी बंजर आहे अंतरातल्या मम दुःखाला रंगरूप ना रंगरुपाहुन स्वभाव त्याचा सुंदर आहे दुःखाला मी करुन दिगंबर निर्भय झाले माझ्यासाठी हाच सुखाचा मंतर आहे कैक आयड्या करून वेड्या गझला लिहिल्या त्या गझलांचे गोठ्यामध्ये झुंबर आहे गोठ्यामधल्या जित्राबांचे शेण काढुनी सारवलेल्या जमिनीवरती लंगर आहे शेणकुटे मी रोज…
-
शिरवा – SHIRAVAA (SHORT RAIN SHOWER)
-
त्र्यंगुल – TRYANGUL (THREE FINGERS WIDE)
गाठायाला हवीहवीशी मंजिल बाई..नोटांचे मज लागत नाही बंडल बाई… सुयोग्य व्यक्तिला मत दे तू अचल मनाने..नकोस झुलवू मनास अपुल्या चंचल बाई… पाचोळ्याने भरून गेले जंगल बाई..कूडा कचरा गोळा करते त्र्यंगुल बाई… शेर असूदे पाच सहा वा सतराशेही..त्यांची चाले गझलेमधुनी दंगल बाई… घरात सखये वीज न आली कोसळली ती..माळ्यावरचा घेच पुसाया कंदिल बाई… अर्थ किती तू…