-
रहो सलामत – RAHO SALAMAT (STAY SAFE)
इतुक्या सुंदर भूमीवरती जगावयाला मिळते आहे भाव फुलांचा तयात दरवळ भरावयाला मिळते आहे लाल असुदे अथवा काळी भूमी प्रसवे वृक्ष लतांना उलते फुलते अंकुर जपते उदरभरण प्राण्यांचे करण्या काठावरती वसोत वाड्या सरिता दुहिता अखंड वाहो नीर तिच्यातील शुद्ध ठेवण्या मती आमुची तत्पर राहो अभयारण्ये हिरव्या राया वन्य जिवांना मुक्त फिराया प्रकृतीतल्या अन्न साखळ्या रहो सलामत…
-
कवयित्री – KAVAYITREE (POETESS)
कोण काय म्हणेल कशास चिंता करिशी कवयित्री कवित्वाचा दागिना तुला लाभला झळाळणारा खरा हृदयातुनी तुझ्या वाहे प्रेमाचा खळाळणारा झरा काव्यातुनी उधळशी हिरे मोती नाही कुठे तू उणी राहू केतू ग्रहांची तुला ना पीडा तुला न वक्री शनी शिडीविना पोचतेस तारांगणी उडोनी पंखाविना वेचशी तारे नभीचे गुंफावया गजरा सुईविना समान तुला पुनव अमावस हिंडतेस ग्रहणी रानात…
-
पदर – PADAR (PLY)
प्रभात समयी ऐकत सुस्वर किलबिल पक्ष्यांची कुंतल सुरभित तरुचे सुकवी सळसळ वाऱ्याची माठ विकतसे शांत दुपारी एकट व्यापारी झुळझुळणारा पदर पिंपळी गानपरी सावरी पिवळ्या कुसुमांनी नटलेला वृक्ष उभा दारी फळे खावया उदुंबरावर येतील का खारी सांजेला झाडांना देई वनमाळी पाणी देवापुढती दिवा लावुनी गाते मी गाणी दिवसभराच्या आठवणींची लिहूनिया डायरी शांतपणे मी झोपी जाते मऊ…
-
गझल एक नाट्यगीत – GAZAL EK NATYAGEET (APPRECIATIVE REVIEW)
कवी मनाला सौंदर्याचे वेड असते. म्हणजे फक्त एखाद्या वस्तूचे, स्थळाचे, किंवा व्यक्तीचे बाह्यरुपच नाही तर त्यातील अंतरंगाच्या सौंदर्याचा शोध घेण्यासाठीही कवी मन धडपडत असते. निसर्गातले गूढरम्य चमत्कार, घटना यांचा तळागाळापर्यंत जाऊन शोध घेण्यासाठी कवी, कलाकार, शास्त्रज्ञ, संशोधक स्वतःच्या पद्धतीने सतत प्रयत्न करत असतात. कवीच्या सुप्त मनाला सतत अपूर्णातून पूर्णाकडे जाण्याची ओढ असते. सृष्टीतील गूढत्वाचे कवी…
-
प्राक्तन – PRAAKTAN (DESTINY)
प्राक्तन दैव नशीब असे शब्द फक्त आपली हतबलता व्यक्त करायला ठीक असतात. खरेतर प्राक्तन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपण स्वतःच भूतकाळात केलेली कर्मे किंवा बांधलेली कर्मेच असतात.ज्याचा भूतकाळ चांगला त्याचा वर्तमानही चांगलाच असतो आणि वर्तमानात जर आपण आपल्याला ओळखून आपल्याला काय हवे आहे हे ओळखून तशीच कर्मे केली तर निश्चितपणे आपला भविष्यकाळही आपल्याला हवा…
-
सोय – SOY (CONVENIENCE)
-
गझनीत – GAZNEET (POEM WHICH IS GHAZAL AND SONNET TOO)
सुरभीतराई हळद माखुनी कनकलता भासे गिरवून मात्रा जलद सावळ्या सलिलसुता भासे अडवून वाऱ्या गडद रांगड्या सळसळता पर्णे समशेरधारी रजत दामिनी रण दुहिता भासे कदली दलांच्या हरित मांडवी अनवट कोड्यांनी लय सूर ताली भरुन सांडण्या घट हलता भासे वसने दिशांची घन निळे धुके मलमल बाष्पाची विखरून देता किरण तांबडा कलश रिता भासे पिवळ्या जमीनी कुरण जांभळे…