-
छल्ले – CHHALLE
मोरपिशी शालूवरी .. छल्ले चांद पंखी ….. पदरा निळे गोंडे गडद .. निळी वेलबुट्टी ….. काठ निऱ्यांचा ग घोळ .. पावलात लोळे ….. जास्वंदीचे पुष्प पर्ण.. चाफ्यासंग डोले….. मोतिमाळ बोरमाळ .. तीन पदर सरी ….. कवडी माळ काळी पोत .. गळेसर लडी ….. चाफेकळी नाक भाळी .. हळदी कुंकू टिळा ….. अधर बंद पाकळ्यात ..…
-
सोड – SOD
पडलं ! कुठलं ! घोडं .. बाई घोडं ! पडलं ! सुटलं ! कोडं .. बाई घोडं ! बघुन हिरवं रान, गाया गाणं ! पडलं ! बसलं ! थोडं ..बाई घोडं ! धरलं म्हणुन, आलं हाती सोनं ! पडलं ! पुजुन ! जोडं.. बाई घोडं ! “धन उधळत”, बोल म्हणता वात ! पडलं ! हसलं…
-
आखाडी अवस – AAKHAADEE AVAS
सांजेला पिंपळी येताच थवे आखाडी अवस पेटवी दिवे पिंपळ पारावर मैफलीत गप्पांच्या अड्ड्यात सुंदर खल आषाढी धारांत गटारी न्हाती खळखळ वेगे धावत जाती खराटे घेऊन निघाल्या बाया झाडून गटारी दिवे लावाया गटार तीरी समयांची रांग तुळशीच्या रानी डोलते भांग
-
टॅटू – TATTOO
बाई सुया घे गं दाभण घे …या जुन्या लोकगीताच्या चालीवर आधारित नवे गीत बाई सुया घे गं दाभण घे …. टॅटू गोंदवुन घ्या गं कुणी … टिकल्या घ्या कुणी ऐना फणी….(धृ. पद) कुरळ्या केसांच्या हौसाबाई डोकं धुवाया घ्या शिकेकाई दुखऱ्या फोडावर धोंडामाई लावा शेकुन बिब्बा बाई झाडाल वाडा मग बावन खणी … टिकल्या घ्या कुणी…
-
जरतार – JARATAAR
लुगडं हिरवं हिरवं गार नेसली बयो लुगडं झक्क नऊ वार नेसली बयो स्वच्छ पान घाटदार देह नेटका लुगडं तलम काळंशार नेसली बयो लाल काठ पीत पदर मधुर भाषिणी लुगडं निळं जाळीदार नेसली बयो लेखणीच खड्ग शस्त्र जात भुताची लुगडं नंदू जरतार नेसली बयो लांछनास सुकर वृषभ टिळा चंदनी लुगडं सात अब्ज भार नेसली बयो जीवाला…
-
मिसळ – MISAL
कधी खावी मिसळ कधी मटकी उसळ मटकी मोडाची मैत्रीण लाडाची मैत्रीण गोरटी नजर चोरटी नजर लागली बाहुली सुकली बाहुली नकटी सुंदर छाकटी सुंदर सुंदर कित्ती बिलंदर बिलंदर माऊ चल साय खाऊ साय आणि साखर मायेची पाखर मायेचं माहेर माहेरची वाट वाटेतला घाट घाटातली झाडी झुकझुक गाडी गाडी गाते गाणे पाखरू दिवाणे …….
-
संक्रांति बाई – SANKRAANTI BAAEE
आली आली संक्रांति बाई.. जणू मोहक जाई जुई… कंकणे वस्त्र तांबडे लाल हातात धरला सुगंधी बेल रथात बैसली मांडीवर मूल सारथी शेजारी हाई चंपक जाई जुई.. रागिणी संक्रांति बाई… भाळावर गोल टिळा लावुनी जात नारीची जनां सांगुनी तृप्त होतसे क्षीर पिऊनी कुंभ धारिणी ताई मोगरा जाई जुई.. मानिनी संक्रांति बाई… नक्षत्र हाय मोहोदरी वायव्य दिशेला…