Tag: Muktak

  • गाज भरती – GAAJ BHARTI

    मुक्तक .. खटका गाज ऐके बघे अंध बहिरी नव्हे वात उडवेल तिज लाट गहिरी नव्हे ओळखावा झणी ताल गझलेतला बाज खटका खडा गीत अहिरी नव्हे गझल ..तृषा चूल पेटे अशी गाव शहरी नव्हे जल हवा नाचरी लेक लहरी नव्हे काटकसरी बरा डाव आहे नवा पीठ घोळून घे तूप जहरी नव्हे व्यर्थ भीती नको गाज भरती…

  • माला – MAALAA

    पुराण पाहून वाचून आले पुराण इतिहास धुंडून आले जरी कैक गुप्त निखळून पाने पुराण हरिवंश ऐकून आले … नवा कशाला हवा रोज मेकप नवे दिसाया बशीहून ते कप जुन्या पुराण्या दिव्याहूनही मज नवीन भावे धुवायास रे कप … चला चलाहो चला मंदिराला चला मुलांनो प्रभू दर्शनाला निळ्या नभाची शिरी आज छाया चला फुलांची विणूयात माला…

  • मन सुंदर – MAN SUNDAR

    मुक्तक … मन समजू नये कधीही गाणे उदासवाणे मन मोद वर्तमानी गाता भरून जाणे उस्फूर्त चार ओळी गाऊन हृदय भरता कळ अंतरी सुखाची ओढू नकाच घाणे मुक्तक …सुंदर अपुला आत्मा सुंदर साधा अंतर म्हणते अंतर साधा गा गा गा गा गा गा गा गा लल गा गा ल ल मंतर साधा

  • किरमिजी – KIRAMIJEE

    मुक्तक… किरमिजी लाल केशरी बिंब किरमिजी गाज समुद्री चिंब किरमिजी कफास करण्या जर्जर विरुनी रक्तवर्ण डाळिंब किरमिजी गझल … किरमिजी भगवेपण केशरी किरमिजी गाज समुद्री सरी किरमिजी नदी किनारी वाहत आली बांबूची टोकरी किरमिजी चल बाजारी विकून येऊ डाळिंबे डोंगरी किरमिजी हृदयासाठी हितकर असते कुळिथाची भाकरी किरमिजी गाई गुरांना वळवुन आणी कृष्णाची बासरी किरमिजी

  • जीवस्व – JEEVASWA

    मुक्तक … जीव जन्म कुपात न सुपात भू वर धरणीवर अश्विनात भू वर हस्ताच्या कोसळत्या धारा जीव झळकला तमात भू वर ….. गझल … जीव स्वरूप जन्मासाठी सूप निवडले दिवा लावण्या तूप निवडले चुस्त काफिया म्हणून गझले मंडुकास प्रिय कूप निवडले अर्घ्य द्यावया भगवंताला भाव सुगंधी धूप निवडले लष्कर पापांचे जाळाया जिनानुयायी भूप निवडले मातृधर्म…

  • दणका – DANAKA

    दोन मुक्तके दणका .. सरळ जिवाचा मणका बिणका गरम भाकरी झुणका बिणका येच एकदा खाण्यासाठी मम सोट्याचा दणका बिणका गुलगोखरू ….. फुलपाखरू फुलपाखरु चल ये धरू फुलपाखरु बाळ्या कुणी म्हणताच ग गुलगोखरू फुलपाखरु

  • वाडा – VADAA

    जाहला गोठ्यात वाडा द्रव्य साही खांब भारी अंगणी गातात पक्षी डोंगरी बाबू जमाली हे उसाचे शेत गाते पूर्व पश्चिम जोडणारी उत्तरेला दक्षिणेची साथ मिळता सौख्य दारी