-
निळी बावरी – NILI BAVARI
This type of poem is known as muktak. It contains four lines. मी निळे प्राशुनी निळी बावरी बनले मी हिरवे प्राशुन सृजनामध्ये रमले मी धवल प्राशुनी धवल कशी ना झाले मी इंद्रधनूच्या रंगात सात सजले
-
आठवण दवात भिजली ATHAVAN DAVAT BHIJALI
आठवण दवात भिजली माझिया अधरी हसली कसा मी रुसवा काढू ओढून घुंगट बसली
-
ब्रम्हचर्य व्रत – BRAMHACHARYA VRATA
Here Radif is directly absent but indirectly present. Kafiyas are Bhaaree, Vaaree, Naaree. ब्रम्हचर्य व्रत भारी स्वर्गाची जणु वारी आत्मधर्म जाणतात पुण्यवान नर नारी
-
घायाळ – GHAYAL
This is the poem containing four lines written in the form of Muktak. In this poem Radif and Kafiya are present. स्मरणी ठेवा घरंदाज मी मारिन टोला फलंदाज मी मुक्यानेच घायाळ करावे अशी आगळी तिरंदाज मी
-
सुरेख घडले – SUREKH GHADALE
In this poem (Muktak) the poetess says, I communicate with every person wisely. My Pen(Kalam, Lekhani) taught me the way of living without violence. संवाद साधताना कोठे कमी न पडले मौनात राहुनीही शब्दाविना न अडले मम लेखणीच मजला शिकवील धर्म प्रीती या लेखणीस स्मरता सारे सुरेख घडले
-
मळवट – MALAVAT
ही धरा म्हणाली काही अन अंबर हसले गाली सावळ्या मृत्तिकेवरती रोमांच जणू या साळी मज कळले नाही तेव्हा तुजलाही कळले नाही विश्वाची हिरवी भाषा बघ मळवट भरते भाळी
-
दर्शन – DARSHAN
In this four lined poem it is described that how sweet and colourful fruits are! दर्शन या मधुर पक्व फळांचे नयनी रेंगाळी अमृतासम चव केळीची जिभेवरी घोटाळी गंध जुईचा वेड लावतो झुळूक लपेटी तन हृदयी चाहुल वाजे पाऊल ऐकत भूपाळी