-
झरतृष्ट – ZARATRUSHTA
कोण हा झरतृष्ट आहे पुस्तकाचे पृष्ठ आहे कोण लिहितो गीत यावर दृष्ट की अदृष्ट आहे … मेघ घन घन कृष्ण आहे जलद भरला तृप्त आहे सांडण्या धो धो सुखाने जाहला संपृक्त आहे … वाफ भरली लुप्त झाली मेघना संतुष्ट झाली गार वारा झोंबल्यावर कोसळूनी मुक्त झाली … रुष्ट होणे बरे नाही गुप्त होणे बरे नाही…
-
रोज लिहावे (तीन मुक्तके) – ROJ LIHAVE
प्रभातीस मी लिहिते काही प्रभातीस आठवते काही किलबिल ऐकत पक्ष्यांची मज प्रभातीस जागवते काही …. लिहिण्यासाठी सहज सुचावे स्वप्न मराठी तुझे तुझे हसावे व्यक्त कराया भाव मोकळे भाषेचे ना बंधन व्हावे …. रोज लिहावे असेच काही अक्षरांतुनी हसेल काही लिहिता लिहिता झरती डोळे देणे त्यातुन जमेल काही ….
-
मंगल(मङ्गल) – MANGAL
मंगल मन्गल मङ्गल चरणी शुद्ध निरञ्जन दीप तेवतो मुनी दिगंबर निर्भय ज्ञानी जितेंद्रिय आत्म्यात राहतो अभय मिळाया जीवांना हा काळ खरा पावन आला हो पानगळीचा ऋतू शिशिर हा मुक्तक लिहिण्या मला भावतो मुक्तक – मात्रावृत्त (३२ मात्रा)
-
भविष्य माझे – BHAVISHYA MAAZE
भविष्य माझे मीच सांगुनी मी घडवावे भविष्य माझे मला न भीती कशाकशाची मीच लिहावे भविष्य माझे भूतकाळ मम् सुंदर होता वर्तमानही सुंदर सुंदर भविष्य सुद्धा अतीव सुंदर ऐसे गावे भविष्य माझे मुक्तक – मात्रावृत्त (८/८/८/८/) ३२ मात्रा
-
आरसपाणी – AARAS-PAANEE
जलद प्रकटले बिजलीसंगे मौन योगिनी सृष्टी झाली जलद जलद घन मुक्त बरसले तप्त धरेवर वृष्टी झाली जलद कृष्ण बन गडद स्मृतींचे हळू उतरले पापणकाठी जलद “सुनेत्रा” झरझर झरले आरसपाणी दृष्टी झाली
-
जादुमयी – JAADUMAYEE
कलाकार सृष्टी जादुमयी कलाकार वृष्टी जादुमयी मला लाभुदे रत्नत्रययुत कलाकार दृष्टी जादुमयी गूढ धीर तिसऱ्या शेरातिल कलाकार तृष्टी जादुमयी तीन शेरांचे मुक्तक (मात्रा १६)
-
लिंब अंतरी – LINB ANTAREE
अकिंचन्य धर्माच्या दिवशी झळाळले जिनबिंब अंतरी जळात विहिरीमधल्या हलतो भावुक होउन लिंब अंतरी सान प्रतिक हे अपरिग्रहाचे हवी तेवढी त्रिज्या घेउन भवती अपुल्या भूमी मापे केंद्रक बनुनी टिंब अंतरी काळ्या मेघी पाहुन डोळे नितळ साजिरे मायपित्याचे सर कोसळली सरसर सरसर झाली सृष्टी चिंब अंतरी मुक्तक तीन शेरांचे… मात्रावृत्त (मात्रा ३२)