Tag: Muktak

  • फिरकी – (to make fun)

    तरल कल्पना सांची भिरभिरणारी कवीची तसे भिरभिरे फुलपाखरु घेत गती कवीची फुल लपे पानाच्या मागे तसा शब्दाचा भुंगा कानामागुन घेतो फिरकी कवीची

  • आयडीया – IDEA

    तीन शेरांचे मुक्तक सत्याच्या मार्गावर चालूनी कसरत करायची टोकावरुनी गाठण्यास पायथ्यास घसरत करायची जीवन सत्यातून निखरण्या होऊन मौनालिसा खास आयडीया काव्यामधुनी पसरत करायची घागर फुंकुन घागर घुमवत श्वासातूनी शुचिता तनमन शांतीसाठी मुख्यार्थाची हसरत करायची

  • जाळीदार – GAUZY

    मुक्तक.. १)पैरण सूक्ष्म तंतूंची बनलेली ऐरण जाळीदार.. सूक्ष्म तंतूंची विणलेली पैरण जाळीदार… सागवानी दार घराचे अंगण त्यावर छान.. सूक्ष्म तंतूंची रचलेली वैरण जाळीदार. मुक्तक ..२)स्वच्छता स्वच्छता असावी तना मनाची अन वचनांची, स्वच्छता करावी स्वतः मनाची अन वचनांची. भावना जयांची असेल सुंदर तर नात्यांची .. स्वच्छता धरावी खुल्या मनाची अन वचनांची.

  • निगोदी – NIGODEE(MICROSCOPIC SOULS)

    तुझी स्वतःची कर्मे तुजला धरतील धारेवरती नाचवून निःकाचित कर्मे फळतील धारेवरती सुधारेन मी पुट्पुट अस्फुट बुडबुडा पाण्यावरचा असे बुडबुडे सुकून ओठी अडतील धारेवरती शब्द परजुनी तप्त विळीसम शेरात प्रकटता झणी जीव निगोदी सुटण्यासाठी उडतील धारेवरती तीन शेरांचे मुक्तक.

  • प्रांत – PRAANT(PROVINCE)

    एक पान एक गाव एक प्रांत एक देश एक तीर्थ घाट छान नीर स्वच्छ नेक देश जायचे मला असेच गात गीत गझल गोष्ट पंच परम पद स्मरण जिनालयात लेक देश

  • स्वर चारोळी – SWAR CHAROLI(FOUR LINES POEM)

    शिकार कसली एक शिकारी कुशल मी तर जीव जपाया स्वर चारोळी कुशल मी तर जिवंत सावज इतुके सुंदर मूर्तिदेवी शशधरनेत्रा रत्न रुबाई कुशल मी तर घडला आत्मा ऐकत गोष्टी गुज फुलांचे मानवतेचा शूर पुजारी कुशल मी तर धर्मासाठी देशासाठी शेर चतुर्थ षट्कारास्तव ओळ आठवी कुशल मी तर गझल हवी जर नाव ‘सुनेत्रा’ तूच लिह रे…

  • घटाटोप – GHATATOP(OVERCAST)

    घटाटोप … आभाळाच्या शिरी शोभतो घटाटोप जलदांचा पाऊस पाडाया धरणीवर खटाटोप जलदांचा डोंगरमाथ्यांवरती धोधो कोसळती जलधारा सत्य शिवाच्या सुंदरतेवर जटाटोप जलदांचा कृष्णमेघ… धरतीवर जणु कलश घड्यांचे कृष्णमेघ झरती भरुन वाहती जोहड धरणे कृष्णमेघ झरती चिंब जाहली भिजुन मृत्तिका निर्झर खळखळतो मधुर तराणे कृतज्ञतेचे कृष्णमेघ झरतो रुमाल… ज्येष्ठामधल्या नक्षत्रांची कमाल जादूई लक्ष लक्ष घन गर्द ढगांचा…