Tag: Rubaaee

  • जेली – JELEE

    रांधली स्वतः मी कवठ गुळाची जेली कणकेस भिजवुनी निरांजने दो केली सुकवून तयांना दिवे तेवता दारी थरथरली पर्णे आम्रतरूची सारी

  • अलक रुबाई – ALAK RUBAI

    घरी वावरे रस्त्यावरची वर्दळ जेंव्हा मुकीमुकी परसामध्ये राबत बसते मर्गळ तेंव्हा मुकीमुकी कोरांटीचे कुंपण हिरवे नाजुकसाजुक सान कळ्या आठवते मज सावलीतली कर्दळ केंव्हा मुकीमुकी … गडद निळाई वाकुन बघते हौदामधल्या जळी पेंगुळलेली रातराणी गोकर्णीसम निळी अश्या अवेळी निळ्या घनातुन बरसे जेंव्हा धार जळात उठती थेंबांभवती वलये गोलाकार … अती लघुत्तम कथेस म्हणती अलक बरे अश्या…

  • जगत – JAGAT

    मी गुणगुणते जे गाणे आहे माझे माझ्यातुन उमले ते ते सारे माझे मी माझे माझे म्हणत राहिले जेव्हा पाहिले जगत मी अवती भवती तेव्हा

  • निर्मल – NIRMAL

    मी लिहीत आहे मुक्तक गझला गाणी झुळझुळते गाते त्यातील निळसर पाणी पाण्यावर डुलते एक कागदी नाव गाठण्या स्वप्नीचे निर्मल सुंदर गाव

  • सोय – SOY

    मौन जपे मी काव्यामध्ये जरी भासले तेव्हा कोणा मरगळल्यासारखी मॅड मला घनचक्कर म्हणता शब्दकळा गोठवीत गेले साकळल्यासारखी शब्दकळेला वा भावांना स्वतःच सुंदर कुरुप बनविता पाहुन अपुली सोय साधे सोपे नियम पाळण्या घडीत नाही नाही म्हणता घडीत म्हणता होय

  • झबक बाई – ZABAK BAAEE

    सत्ताविस मात्रात बांधली सुबक रुबाई खास पूजन करण्या मीच सजविले तबक रुबाई खास ब्रह्मांडातिल जीवजीवांना हिचेच वेड नि ध्यास सृष्टि सुनेत्रा सुंदर बाई झबक रुबाई खास

  • आत्महितैषि – AATM HITAISHEE

    … गागाल गागाल हे अखरब साठी सुरुवातीला सोपे लिहुया अवघड ना गण गागालगा गागागा हे अखरम साठी आरंभाला गाललगा च्या सारखेच हे ग ललगागा … आत्महितैषि बरसावे मी श्रावणातल्या ढगासमान रिते रिते मी व्हावे उडण्या खगासमान प्रेम वसे मम हृदयी सम्यक आत्महितैषि जन रीती पण पाळाव्या मी जगासमान