Tag: Rubaaee

  • निर्मल – NIRMAL

    मी लिहीत आहे मुक्तक गझला गाणी झुळझुळते गाते त्यातील निळसर पाणी पाण्यावर डुलते एक कागदी नाव गाठण्या स्वप्नीचे निर्मल सुंदर गाव

  • सोय – SOY (CONVENIENCE)

    मौन जपे मी काव्यामध्ये जरी भासले तेव्हा कोणा मरगळल्यासारखी मॅड मला घनचक्कर म्हणता शब्दकळा गोठवीत गेले साकळल्यासारखी शब्दकळेला वा भावांना स्वतःच सुंदर कुरुप बनविता पाहुन अपुली सोय साधे सोपे नियम पाळण्या घडीत नाही नाही म्हणता घडीत म्हणता होय

  • झबक – ZABAK (RACEME)

    सत्ताविस मात्रात बांधली सुबक रुबाई खास पूजन करण्या मीच सजविले तबक रुबाई खास ब्रह्मांडातिल जीवजीवांना हिचेच वेड नि ध्यास सृष्टि सुनेत्रा सुंदर बाई झबक रुबाई खास

  • आत्महितैषि – AATM HITAISHEE (SEEKER OF SPIRITUAL WELFARE)

    … गागाल गागाल हे अखरब साठी सुरुवातीला सोपे लिहुया अवघड ना गण गागालगा गागागा हे अखरम साठी आरंभाला गाललगा च्या सारखेच हे ग ललगागा … आत्महितैषि बरसावे मी श्रावणातल्या ढगासमान रिते रिते मी व्हावे उडण्या खगासमान प्रेम वसे मम हृदयी सम्यक आत्महितैषि जन रीती पण पाळाव्या मी जगासमान

  • अखरम – ARHARAM

    गागागा लिही अखरम साठी अखरब साठी गागाल रुबाईतले माणिक मोती ढाळत आहे आभाळ पाचु पोवळ्यांच्या राशींनी नटली सजली मुग्ध धरा दो भृकुटिंच्या मधे रेखते चंद्रकोर अन टिंब धरा

  • नाताळ – NAATAAL (CHRISMAS)

    नाताळ घेऊनी आलाय भेटी कोण सांगा घेऊनी भेटींस गोष्टी दोन सांगा गोडवा नात्यात आणे काव्य माझे गातसे नाताळ गाणे रम्य माझे … तराई मम् रुबाईत मीच लिहिले “बोल” गझले मम तराईत मीच दडले बोल गझले भावलिंगी मुनी दिगंबर आत्मधर्मी मम शिलाईत मीच विणले “बोल” गझले … सगाई अखरम वा अखरब असुदे तव वृत्त रुबाई मतला…

  • पंचरत्न रुबाई – PANCH RATNA RUBAI

    आषाढी धोंडा अधिकच मोठा वाटे शोधून स्वतःतिल उणे टोचण्या काटे पाडली जयांनी भिंत मनूची दगडी ते फेकुन देतीअंधरुढींची पगडी ही पहा रुबाई माझीही गाताना मात्रांची बाविस म्हणते मजला गाना मी गाता गाता लिहिते अन हसतेही जे निसटाया आतुर त्यांना धरतेही हा कोकिळ ताना अवेळीच का घेई गाण्यातिल अमृत कुणाकुणाला देई मज नकोच अमृत हवे घनातिल…