Tag: Savatee kaafiyaa ghazal

  • खाक्या – KHAKYAA(METHOD OF DOING WORK)

    मौन काव्या कळे सख्य माझे तुझे मौन अधरी भले सख्य माझे तुझे नित्य सौख्यात मी रोज तैसाच तू मौन उघडे दळे सख्य माझे तुझे दावता पोलिसी कडक खाक्या तुझा मौन किंचित हले सख्य माझे तुझे मस्त माझ्यात मी मूक होते सखे मौन सखये तळे सख्य माझे तुझे शोध कोठे सखी गुप्त झाल्या सख्या मौन मुक्ताफळे…

  • तुंबळ- TUMBAL (FIERCE)

    मंगल मंगळ मंगळवार मंदिर आगम कंदिल वार चंचल उपवन जंगल रान मंथर अंगण अंचल वार कुंदन कंकण किणकिण नाद मंद पवन घन मंजुळ वार झुंबर अंबर लखलख वीज मंचक झुलता कुंडल वार पावन बेला गोरज सांज मंत्र णमो जिन मंगल वार वृत्ती वृत्तातील प्रकार मंदाक्रांता तुंबळ वार शुक्र उगवला वारी आज मंडप मांडव मंडळ वार

  • आनन – AANAN (FACE)

    अभ्यासाचे साधन पुस्तक ज्ञान मिळविण्या कारण पुस्तक स्वाध्यायास्तव विनम्र भावे करते हाती धारण पुस्तक दो घटकेच्या मौजेखातर नकोस ठेवू तारण पुस्तक जीव ओतुनी लिहिल्यावरती आत्मसुगंधी कानन पुस्तक बिंब दाविते ज्याचे त्याला तुझे सुनेत्रा आनन पुस्तक

  • जान – JAAN (LIFE)

    आपट्याचं पान सोन्याची खाण आपट्याचं पान शेवाळी वाण ओरबाडु नका आपट्याचं रान आपट्याचं  रोप किती किती सान आपट्यास जपू वाढाया छान आपट्याचं झाड बागेची शान वृक्ष वल्लरीत सृष्टीची जान

  • दीपावली – DIPAVALI (FESTIVAL OF LIGHTS)

    दीपावली दीपावली दीपातळी दीपावली आली दिवे लावावया दीपा कळी दीपावली नामासवे नावेपरी दीपा जळी दीपावली गालावरी दोन्ही पडे दीपा खळी दीपावली चाफा फुले गाण्यातुनी दीपा दळी दीपावली सवती जरी हा काफिया दीपा फळी दीपावली सोन्यापरी आहे खरी दीपा सळी दीपावली

  • घनसर नाणी – GHANSAR NAANEE (SOLID COINS)

    मधाळ प्रीती वचनामध्ये उतरू दे ग सुकलेले सुख जळणामध्ये उतरू दे ग बुडून जाता भरतीच्या या उचंबळात मधुरा भक्ती भजनामध्ये उतरू दे ग दे चटका डाळीस शिजवुनी जड कढईत रंग गुळाचा पुरणामध्ये उतरू दे ग जिरे मिरे वाटून फोडणी दे डाळीस स्वाद तयांचा वरणामध्ये उतरू दे ग रदीफ माझ्या गझलेमधले वादातीत पदे आरत्या कवनामध्ये उतरू…

  • भारत भूमी – BHARAT BHUMI (mother land India)

    भारत भूमी माता माझी जिनानुयायी पिता भारत भूमी मारे बाजी जिनानुयायी पिता धर्म अहिंसा हृदयामध्ये जपण्यासाठी सदा भारत भूमी लढण्या राजी जिनानुयायी पिता मिया नि बीबी असता राजी लग्नासाठी जिथे भारत भूमी होते काझी जिनानुयायी पिता वृद्ध जाहली जरी वयाने कुंतल पिकले जरी भारत भूमी सदैव ताजी जिनानुयायी पिता कटू विषासम सत्य पचवुनी जगण्यासाठी पुन्हा…