Tag: Swar-kaafiyaa Ghazal

  • सावळे – SAVALE

    मौन टिपण्या सावळे मी मौन झाले माझिया जीवासवे मी मौन झाले चंद्र गोलाकार बघुनी भाकरीचा जाणत्या बकरीपुढे मी मौन झाले जाहले नेते शिकारी गर्जणारे रान ते किंचाळले मी मौन झाले रंग काळा अशुभ लेश्या काळगेले अंकशास्त्री बरळले मी मौन झाले गुंफुनी नावा ‘सुनेत्रा’ शेर लिहिता गुरु गझल घन बरसले मी मौन झाले

  • गिरी धन – GIREE DHAN

    चलन वलन सत्य शाश्वत आत्मा साक्षी मम अचल चलावर गिरी धन आत्मा साक्षी मम ललल ललल गाल गालल गागा गागा लल लगावली मात्र भूजल आत्मा साक्षी मम

  • झनक ठुमक – ZANAK THUMAK

    झनक ठुमक ताल ठेका पाऊले पहा लयीत लय सूर ठेका पाऊले पहा बांबु बन डुले हले मेघ फुलोरा झुले केवडा सुगंध ठेका पाऊले पहा ललल ललल गाल गागा गागागालगा लगावला मस्त ठेका पाऊले पहा तरुण वरुण वीज वारा झुलते नभ धरा भावले ढगांस ठेका पाऊले पहा गात सुनेत्रा तराणे नाचे अंगणी नयन हस्त चरण ठेका…

  • ओटी – OTI

    मंगलमय मन संथ सावळी कृष्णामाई तू ग्रामस्थांची कुलस्वामिनी कृष्णामाई तू अष्टक देण्या भावफुलांनी कुमारिका आल्या प्रीतीने भर निसर्ग ओटी कृष्णामाई तू गवार भेंडी खिरा काकडी रक्तिमा साखरी कलिंगडातिल सत्त्व राखशी कृष्णामाई तू मुळा मुठा पवना कावेरी इंद्रायणी कऱ्हा गंगा नीरा झेलम तापी कृष्णामाई तू डोंगरातले निर्झर झरती बावखोल भरती मुक्त गझाला अभयारण्यी कृष्णामाई तू घटप्रभा…

  • दीप दीप – DEEP DEEP

    दीप दीप लक्ष दीप तेवतात शांत दीप चंद्र शुक्र गगन दीप देह चैत्य आत्म दीप अंतरात लाव दीप गझल वात भाव दीप मम सुनेत्र दोन दीप  

  • काय – KAAY

    काय लिहू मी काय लिहू काय कोण का प्रश्न लिहू प्रश्न नको तर उत्तर घे काय पुढे दो टिम्ब लिहू विरामचिन्हे टपटपती काय देह तनु चिंब लिहू खरा देव मम आत्मगुरुच काय कशाला मीच लिहू शेर खरे की वाघ बरे काय सुनेत्रा नाव लिहू

  • जिनस्तुती – JIN STUTI

    शुक्रवार शुक्रवार शुक्रवार गा शुक्र धार वीर नार गाल गाल गा आज दिवस शुक्रवार काल कोणता शुक्रवार च्या प्रथम गुरूर वार गा शुक्रवार नंतर दिन सांग कोठला वासर शनि हाच ठाम करत कार्य गा राध शुद्ध अर्थ बोल आत्म देव रे रवि नि सोम निकट वार ताल धरत गा काफिया स्वर मधुर मम तरल भावना…