Tag: Swar-kaafiyaa Ghazal

  • स्मार्ट – SMART (having a quick mind or high intelligence/ stylish automated))

    लीड माझे लेखणीने जीव रक्षे लेखणीने सत्य धर्मा जागताना जलद खोडे लेखणीने संगणक हा स्मार्ट साधू शीड हलवे लेखणीने मज उणे नाही कुठेही पात्र भरते लेखणीने टोक गाठाया सुनेत्रा खुंट रोवे लेखणीने

  • सर्किट – CIRCUIT (a complete closed path or route that starts and ends in the same place)

    सळसळ .. उकल उखळ वा मुसळ असूदे नयनी सलते कुसळ असूदे लिहिण्यासाठी वेळ किती मज लिहित राहते सळसळ असूदे ….. अवघडलेल्यांना ते अवघड सोप्यांमधले सोपे अवघड चित्र शिल्प काव्यासम सर्किट जड बुद्धीला वाटे अवघड उघडे पडता पितळ तयांचे त्यांचें त्यांना झाले अवघड ग्राहक राजा आला दारी नकोच मोजू पाने अवघड लक्ष्मी देते सहस्त्र हस्ते सहज…

  • भृंगधर – BHRUNGA DHAR(BEARER OF A BETTLE)

    जलवंती फुलवंती जलधर जलद मेघ घन गिरिधर गुणधर ढग आभाळी श्यामल श्यामल जणु गंगाधर गगनी हलधर कृष्णाकाशी रेघ विजेची गजावरी आरूढ भृंगधर तमी उजेडी पुण्य पाप बघ अर्घ्य द्यावया शुद्ध भाव धर मिटून डोळे रव श्वासाचा ऐक सुनेत्रा करी बिंब धर

  • काढा – KADHA(NUTRITION)

    भाव झळके मंत्र म्हणता टिपुन घे कोणास सांगू मंत्र टिपता कागदावर उचल दे कोणास सांगू चोरुनी मंत्रास करती कैद जाती गोत्रवेड्या मंत्र माझा फिरुन येता धुमस रे कोणास सांगू अर्थ देई जीवनाला रंग स्वप्नांना नव्याने एक काढा पंडिता मी बनविते कोणास सांगू रडकथांचा पुसुन पाढा भूतकाळातिल व्यथांचा इंद्रधनुषी रंग भर चित्रात मम कोणास सांगू वेगळेपण…

  • बुमरँग – BOOMERANG

    नवरी मोजे नऊ दिवस नवे नव्याचे नऊ दिवस घट मातीचा धान गहू उगवे वाढे नऊ दिवस चैत्रामधल्या नवरात्री वसंत नाचे नऊ दिवस मेंदी हळदी चुडा मणी झेल टोमणे नऊ दिवस कर्मकरंट्यांना बडगा नव्व्याणवचे नऊ दिवस हाव दागिन्यांना चाटे सोसत फटके नऊ दिवस कौटुंबिक हिंसाचारी मूळ पोसले नऊ दिवस सैल जिभांना आवळता पुरते जिरले नऊ दिवस…

  • भरते – BHARTE(FILLING)

    समुद्रातले खारे पाणी मृगजळ लहरी फसवे पाणी दुःख मनीचे भरता नयनी गालावर कर्मांचे पाणी कृष्ण घनांना भरते येता जल आनंदाश्रूंचे पाणी तहानलेल्या मृगास फिरवी भ्रम दृष्टीचे कोरे पाणी लीड घ्यावया शिसे पचविते मम इच्छाशक्तीचे पाणी

  • कार्यकारणभाव – KARY KARAN BHAV (CAUSE AND EFFECT)

    कार्यकारण भाव जाणू सृष्टिचे विज्ञान जाणू रोखण्यास्तव कर्मबंधन संवराचे कार्य जाणू जीव पुद्गल वेगळेपण अंतरी ध्यानात जाणू निर्जरेच्या साधनेला तपवुनी देहास जाणू धर्म जीवांचा अहिंसा हे सुनेत्रा सत्य जाणू